Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2025 : समान नागरी कायद्याचा रोडमॅप कसा असणार? नेमकं काय म्हणाले पुष्कर सिंह धामी?

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील सहभागी झाले आहेत.

WITT 2025 : समान नागरी कायद्याचा रोडमॅप कसा असणार? नेमकं काय म्हणाले पुष्कर सिंह धामी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 9:02 PM

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील सहभागी झाले आहेत.  आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना ‘एक देश, एक विधान नवा हिंदुस्तान’ या विषयावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत ‘एक देश, एक विधान नवा हिंदुस्तान’ या व्हिजनवर वाटचाल करत आहे, असं धामी यांनी यावेळी म्हटलं.

नेमंक काय म्हणाले धामी?

देश प्रगतीपथावर आहे. 2014 पासून देशामध्ये असे अनेक कामं झाली आहेत, ज्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांना प्रतिक्षा होती. ज्यामध्ये अर्टिकल 370 रद्द करण्यात आलं. अयोध्यामध्ये राम मंदिराचं निर्माण झालं. तीन तलाकचा कायदा मंजूर झाला. समान नागरी कायदा आला. भारत आज संपूर्ण जगाचं नेतृत्व करत आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे, अशी अनेक कामं गेल्या दहा वर्षांमध्ये झाली आहेत, असं धामी यांनी यावेळी म्हटलं.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा रोडमॅप कसा असणार असा प्रश्न यावेळी धामी यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, उत्तराखंडमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आम्ही ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढलो. आम्ही त्यावेळी उत्तराखंडमधील जनतेला अश्वासन दिलं होतं, की जर राज्यात आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही समान नागरी कायदा लागू करू, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्ता आली. उत्तराखंडमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलते असा जो समज होता तो लोकांनी खोटा ठरवला, आमची सत्ता आल्यानंतर आम्ही उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू केला, असं धामी यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला आता हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जातं? यावर प्रतिक्रिया देताना धामी यांनी म्हटलं की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडतो. माझं नाव मोठं व्हाव याकरता मी कधीही काम करत नाही.मी अनेक अनुभव घेतले आहेत. त्यामुळे मी काम करत राहातो असं धामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुस्लिमांचा समावेश हा समान नागरी कायद्यात केला आहे, मात्र आदिवासी समाजाला बाहेर का ठेवण्यात आलं, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, संविधानातील तरतुदीनुसारच सर्व निर्णय घेण्यात आले आहेत.

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.