डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय भारताला फायदाच फायदा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यादीच सांगितली

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. आता ट्रम्प यांच्या विजयामुळे भारताचा काय फायदा होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय भारताला फायदाच फायदा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यादीच सांगितली
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:39 PM

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यांनी कमला हॅरीस यांचा पराभव केला.डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा भारतावर काय परिणाम होणार? असा प्रश्न सध्या अनेक भारतीयांच्या मनात आहे. या प्रश्नावर सध्या अनेक वृत्तपत्र, न्यूज वेबसाईट आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकजण वेगवेगळे मुद्दे याबाबत मांडताना दिसत आहेत. दरम्यान आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रप्प यांची व्हाईट हाऊसमधील एण्ट्री म्हणजे भारतासाठी मोठी संधी आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत होतील,व्यापाराला चालना मिळेल.

एस जयशंकर चार दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सिडनीमध्ये विविध कंपन्यांचे सोईओ आणि उद्योगपतींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.ट्रम्प यांच्या विजयामुळे व्यावसायिक आणि राजनौतिक संबंधांबाबत पाच महत्त्वाच्या परिणामांची शक्यता आहे. तसेच त्यांच्या निवडीमुळे जागतिकीकरणावर देखील मोठा परिणाम होईल असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

भारताला काय फायदा होणार?

ट्रम्प यांच्या निवडीचा भारताला काय फायदा होणार याबाबत बोलताना एस जयशंकर यांनी म्हटलं की, भारत या विजयाकडे विविध पैलुंनी पाहातो आहे.सर्व प्रथम जागतिक पातळीवर पुरवठा साखळीचा प्राधान्यक्रम आधीच बदलला आहे. मात्र अमेरिकन राष्ट्राधाक्षाच्या निवडणूक निकालानंतर त्याला अधिक वेग येण्याची संधी आहे, याचा भारतला फायदा होऊ शकतो याकडे आम्ही एक संधी म्हणून पाहात आहोत.पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की,सध्या जागतिकीकरणाला अधिक वेग येत आहे.त्यामुळे यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील अमेरिकेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यामुळे अमेरिका आणि भारताचे परस्पर आर्थिक, व्यापारिक संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.