Chandrayaan-3: चंद्रयान 3 च्या लँडिंगवेळी काही गडबड झाली तर इस्रो काय करणार? जाणून घ्या प्लान बी

Chandrayaan-3: चंद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. इस्रोनेही यशस्वीरित्या लँडिंग करेल असं सांगितलं आहे. पण ऐनवेळी काही झालं तर काय...

Chandrayaan-3: चंद्रयान 3 च्या लँडिंगवेळी काही गडबड झाली तर इस्रो काय करणार? जाणून घ्या प्लान बी
Chandrayaan-3: चंद्रयान 3 च्या लँडिंगचं काउंटडाऊन सुरु, जर काही अक्रित घडलं तर इस्रोनं केलं असं प्लानिंग
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 6:30 PM

मुंबई : भारतीय अंतराळ संस्था असलेल्या इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. काही तासांमध्ये चंद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्चाचा प्रयत्न करणार आहे. चंद्रयान 2 मोहिमेवेळी याच वेळेला नेमकी गडबड झाली होती आणि मोहीत अपयशी ठरली होती. पण यावेळेस इस्रोने बोध घेत चांगली तयारी केली आहे. चंद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असणार आहे. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असणार आहे. पण या मोहिमेत काही गडबड झाल्याचं कळलं की ही मोहीम 27 ऑगस्टपर्यंत टाळली जाईल. लँडर मॉड्युल चंद्रावर उतरण्याच्या दोन तासाआधी याबाबत निर्णय घेतला जाईल.

“लँडिंग संबंधित निर्णय हा लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्राच्या तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. चंद्रयान 23 ऑगस्टला चंद्रावर उतरण्याच्या दोन तासांआधी हा निर्णय घेतला जाईल. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर चंद्रयानचं लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत टाळली जाईल. पण अशी काही स्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. त्यामुळे चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरेल”, असं निलेश एम. देसाई (संचालक, इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटर) यांनी सांगितलं. चंद्रयान 2 च्या अपयशानंतर चंद्रयान 3 चं 14 जुलैला प्रक्षेपित केलं होतं.

‘सर्वकाही फेल झालं तरी चंद्रयान 3 चं विक्रम लँडर होणार यशस्वी’

“विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल यात काही शंका नाही. यात सर्व सेंसर आणि दोन इंजिन काम करत नसेल तरी लँडिंग निश्चित आहे. कारण तशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे.”, असा इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

लँडिंगच्या वेळी किती वेग असेल?

विक्रम लँडर ज्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल तेव्हा त्याची गती 2 मीटर प्रति सेकंदच्या आसपास असेल. तसेच हॉरीझोंटल गती 0.5 मीटर प्रती सेकंद असेल. विक्रम लँडर 12 डीग्री उतरण असलेल्या उतारावर उतरू शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.