Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राकडून राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन, व्हॉट्सअॅपची थेट उच्च न्यायालयात धाव, सरकार म्हणतं…

केंद्राच्या या निर्णयामुळे 'राईट टू प्रायव्हसीचा' (Righ To Privacy) भंग होतो, असं म्हणत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या या कायद्यालाच आव्हान दिलंय.

केंद्राकडून राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन, व्हॉट्सअॅपची थेट उच्च न्यायालयात धाव, सरकार म्हणतं...
whatsapp
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 8:11 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात बदल करत व्हॉट्सअॅपकडे मेसेजच्या उगमस्थानाची माहिती देणं बंधनकारक असेल असं म्हटलं. त्यानंतर व्हॉट्सअॅप याविरोधात थेट दिल्ली उच्च न्यायालयात गेलंय. केंद्राच्या या निर्णयामुळे ‘राईट टू प्रायव्हसीचा’ (Righ To Privacy) भंग होतो, असं म्हणत व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या या कायद्यालाच आव्हान दिलंय. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने यावर खासगीपणाचं उल्लंघन करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसेच आम्हाला केवळ काही मेसेजची माहिती हवी असल्याचं नमूद केलंय (WhatsApp challenge new IT rules of Modi Government on right to privacy in Delhi High court).

“चॅटचा माग काढायला सांगणं म्हणजे प्रत्येक मेसेजवर पाळत ठेवण्यासारखं”

व्हॉट्सअॅपने आपली मेसेज चॅट सेवा ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असल्याचं सांगत आम्ही मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळतो त्याची माहिती ठेवत नसल्याचं नमूद केलंय. व्हॉट्सअॅपने आपल्या याचिकेत म्हटलं, “व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही चॅटचा माग काढायला सांगणं म्हणजे प्रत्येक मेसेजवर पाळत ठेवण्यासारखं आहे. यामुळे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचं उल्लंघन होईल. तसेच नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसी अधिकाराची गळचेपी होईल.”

“व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीचा भंग करणाऱ्या नियमांना जगभरातील नागरी संघटना आणि तज्ज्ञांचा विरोध आहे. आम्ही या सर्वांसोबत मिळून काम करतो आहे. याशिवाय आम्ही भारत सरकारसोबतही यावर काही व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. यात लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही कायदेशीर विनंती झाल्यानंतर उपलब्ध माहिती पुरवण्याचाही समावेश आहे,” अशीही माहिती व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यामुळे अनेक गोष्टींचं उल्लंघन होणार

केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नव्या नियमामुळे मेसेजच्या मूळ संदेशकर्त्याची माहिती उघड केल्यानं देशाच्या हिताला आणि या कायद्यातील इतर तरतुदींनाही नुकसान पोहचेल, असंही व्हॉट्सअॅपनं म्हटलंय.

केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान माहिती मंत्रालयाचा खुलासा

केंद्र सरकारने या याचिकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “राईट टू प्रायव्हसी हा घटनात्मक अधिकार आहे. सरकारचा राईट टू प्रायव्हसीचं उल्लघंन करण्याचा हेतू नाही. परंतु व्हॉटसअॅपने एखादा मेसेज जो देशासाठी धोकादायक असेल त्याचं उगमस्थान देणं बंधनकारक असेल. देशाची सुरक्षा, परदेशी संबंध, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याशी संबंधित मेसेजचं उगमस्थान व्हॉटसअॅपला द्यावं लागणार आहे.”

हेही वाचा :

गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर

WhatsApp पुन्हा दोन पावलं मागे, Privacy Policy स्वीकारण्याची डेडलाईन पुढे ढकलली, ‘या’ युजर्सना संधी

WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा

व्हिडीओ पाहा :

WhatsApp challenge new IT rules of Modi Government on right to privacy in Delhi High court

खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.