PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून गुरू गहिवरले; फिरवला डोक्यावरून प्रेमाने हात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून गुरू हसले. तर त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पंतप्रधान मोदींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तर त्यांच्या शिक्षकांने त्यांना मिठीही मारली.

PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून गुरू गहिवरले; फिरवला डोक्यावरून प्रेमाने हात
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 6:54 PM

नवसारी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गुजरातमधील नवसारी येथील वडनगर येथील त्यांच्या शाळेतील शिक्षकांची (school teachers) भेट घेतली. पीएम मोदी गुजरात गोरव अभियानात (Gujarat Gorav Abhiyan) सहभागी झाले होते. यावेळी नवसारीतील त्यांच्या वडनगर येथील माजी गुरूला भेटल्यानंतर गुरू-शिष्य दोघेही भावूक झाले. आपल्या शिष्याला पंतप्रधान म्हणून पाहून ते लगेच आलिंगन देण्यासाठी पुढे गेले. बराच काळ दोघेही जुन्या काळात हरवले होते. यावेळी त्यांनी नवसारीच्या आदिवासी भागातील खुडवेलमध्ये सुमारे 3,050 कोटी रुपयांच्या विकास उपक्रमाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये सात प्रकल्पांचे उद्घाटन, 12 प्रकल्पांची पायाभरणी आणि 14 प्रकल्पांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे. हे प्रकल्प परिसरातील पाणी पुरवठा सुधारण्यास तसेच ‘कनेक्‍टिव्हिटीला चालना देण्यासाठी आणि राहणीमानात सुसूत्रता वाढवण्यास’ मदत करतील.

मोदींना पाहून गुरू हसले

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गुजरातमधील नवसारी येथील वडनगर येथील त्यांच्या शाळेतील शिक्षकांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदी गुजरात गोरव अभियानात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून गुरू हसले. तर त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पंतप्रधान मोदींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तर त्यांच्या शिक्षकांने त्यांना मिठीही मारली.

केले वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमिपूजन

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, या प्रकल्पांमुळे प्रदेशातील पाणीपुरवठा सुधारण्यास तसेच कनेक्टिव्हिटी वाढविण्यात आणि राहणीमान सुलभ करण्यात मदत होईल. तापी, नवसारी आणि सुरत जिल्ह्यातील रहिवाशांसाठी 961 कोटी रुपयांच्या 13 पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले. तर सुमारे 542 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवसारी जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजनही त्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सुमारे 586 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मधुबन धरणावर आधारित आस्टोले प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळेल.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांनी 8 पाणीपुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली

तापी जिल्ह्यातील रहिवाशांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वीरपूर व्यारा सबस्टेशनचे, 20 कोटी रुपयांच्या 14 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आणि वलसाड जिल्ह्यातील वापी शहरासाठी 21 कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. तसेच सूरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी 549 कोटी रुपयांच्या 8 पाणीपुरवठा प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. नवसारी जिल्ह्यात 33 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या खेरगाम आणि पिपळखेडला जोडणाऱ्या रुंद रस्त्याचे भूमिपूजनही त्यांनी केले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.