Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भैय्या, लसूण किती रुपयाला ? जेव्हा राहुल गांधी भाजी आणायला बाजरात जातात…केला Video शेअर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला महागाई वरुन घेरले आहे. त्यांनी आज दिल्लीतील भाजी मंडईत जाऊन भाज्यांचे दर विचारले. आणि महिलांशी या विषयावर बोलून त्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

भैय्या, लसूण किती रुपयाला ? जेव्हा राहुल गांधी भाजी आणायला बाजरात जातात...केला Video शेअर
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 2:10 PM

नेहमीच वेग- वेगळे व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाज्यांचे भाव जाणून घेण्यासाठी थेट भाजी मंडई गाठली. राहुल गांधींनी तेथील दुकानदारांना लसून, टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर विचारले. दुकानदाराने त्यांना सांगितले की लसूण ४०० रुपये किलो आहे. या भाजीमंडईला दिलेल्या भेटीचा एक व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केलेला आहे. त्याला पोस्ट करताना राहुल गांधी यांनी लिहीलंय की कधी ४० रुपयांना मिळणारा लसूण आता ४०० रुपयांचा झाला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे आणि सरकार कुंभकर्णासारखे झोपलेले आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ दिल्ली येथील गिरीनगर समोरील हनुमान मंदिर भाजी मंडईचा आहेत. या व्हिडिओ महिला बोलताना दिसत आहेत की त्यांना राहुल गांधी यांना चहासाठी बोलावले आहे. म्हणजे त्यांना घरी येऊन पाहावे किती महागाई वाढलेली आहे.त्यामुळे गृहिणींचे बजेट गडबडलेले आहे.राहुल गांधींना महिला तक्रार करताना दिसत आहेत की पगार तर वाढलेला नाही. परंतू वस्तूंचे दर वाढलेले असून ते कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत आणखी दरवढ होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

४० – ५० रुपयांच्या खाली काहीच मिळत नाही

व्हिडीओत महिलांना राहुल विचारत आहेत की आज काय खरेदी करत आहात? या प्रश्नावर एक महिला सांगते की ती थोडे टॉमेटो, आणि थोडा कांदा विकत घेऊ इच्छीत आहे म्हणजे वेळ निभावून नेला जाईल. एक महिला भाजीवाल्याला विचारताना दिसते की यंदा भाजी एवढी महाग का आहे.? काहीच स्वस्त होताना दिसत नाही. कोणतीही भाजी ३०-३५ रुपयांना मिळत नाही. सर्वांचे दर ४०-४५ रुपयांपेक्षा जादा आहे.

राहुल गांधी यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ येथे पाहा –

सोनं स्वस्त होईल पण लसूण नाही !

राहुल गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात भाजीवाला देखील बोलताना दिसत आहे की यंदा महागाई जास्त आहे.यापूर्वी एवढी महागाई कधीच नव्हती. राहुल गांधी भाजीवाल्याला विचारतात लसूण कितीला दिला ? यावर भाजीवाला लसणाची दर ४०० रुपये किलोवर आला आहे. एक महिला म्हणतेय की सोनं स्वस्त होईल पण लसूण नाही !

एक महिला या व्हिडीओत म्हणते की शलजमची भाजी ३०-४० रुपये किलो मिळायची तिचा भाव आता ६० रुपये किलो आहे.मटर १२० रुपये किलो मिळत आहे. राहुल गांधी महिलांना विचारताना दिसत आहेत की महागाई दरवर्षी वाढत आहे. तुमच्यावर देखील त्याचा भार वाढला असेल ना ? राहुल यावेळी म्हणाले की जीएसटीने महागाई वाढली आहे. यास महिलांना दुजोरा दिल्याचे दिसत आहे.

दिल्लीत पुढच्या वर्षी फेब्रुवारीत विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्याआधीच राहुल गांधी एक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलेले आहे. राहुल गांधी सोमवारी परभणी येथे आले होते. तेथे संविधानाची प्रतिकृती नष्ट केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर अटक केलेल्या एका तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. या पीडीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी दलित असल्यानेच पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.