VIDEO : जेव्हा राहुल गांधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरतात…

भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातव्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत. मध्य प्रदेशातील उर्वरित जागांसाठीही या टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात गेलेले राहुल गांधी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला नुकतीच सत्ता मिळाली आहे. पण राहुल गांधी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरले आणि दुसरंच नाव त्यांनी घेतलं. […]

VIDEO : जेव्हा राहुल गांधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातव्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत. मध्य प्रदेशातील उर्वरित जागांसाठीही या टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात गेलेले राहुल गांधी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला नुकतीच सत्ता मिळाली आहे. पण राहुल गांधी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं विसरले आणि दुसरंच नाव त्यांनी घेतलं.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राहुल गांधींना यावरुन टोला लगावलाय. शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे तुम्ही अखेर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बदललेच, तुमच्या सारखा नेताच हे काम करु शकतो, असा टोला शिवराजसिंग यांनी लगावला.

राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओही व्हायरल होतोय. यामध्ये चुकून त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांचं नाव घेतलं. भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून राहुल गांधींनी हुकूमसिंग कराडिया यांचं नाव घेतलं. राहुल गांधींना ट्विटरवर यामुळे ट्रोलही करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.