Chandrayaan 3 Update : चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत केव्हा जाणार ? ISRO महत्वाची भूमिका घेणार, पाहा काय चालू आहेत अंतराळात घडामोडी
चंद्राच्या कक्षाजवळ पोहचणे केवळ चंद्रयान-3 मोहिमेचा एक भाग आहे. चंद्रयान-3 मोहिमेची खरी कसोटी यान चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर सुरु होणार आहे.
बंगळुरु | 31 जुलै 2023 : भारताची तिसरी चंद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) आता चंद्राच्या कक्षेत पोहण्याच्यासाठी थोडाच अवधी शिल्लक राहीला आहे. इस्रोने त्यासाठी योजना बनविली आहे. आज मध्यरात्री 12 ते 1 वाजे दरम्यान ही प्रक्रीया राबिवली जाणार आहे. ट्रान्स लूनर इंजेक्शनची ही प्रक्रीया सुरु होण्यासाठी 28 ते 31 मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. हे कार्य यशस्वी झाल्यास भारत अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश ठरणार आहे.
चंद्रयान – 3 थ्रस्टर्सना सुरु करून त्याचा वेग वाढविण्याची प्रक्रीया पृथ्वीपासूनच्या त्याच्या सर्वात कमी अंतराच्या वेळी यासाठी केली जाते कारण तेव्हा त्याचा वेग सर्वात जास्त असतो. चंद्रयान-3 सध्या 1 किमी/ सेंकद आणि 10.3 किमी सेंकदाच्या दरम्यान वेगाने अंडाकार कक्षाने पृथ्वीभोवती फिरत आहे. चंद्रयान-3 चा वेग वाढविताना त्याचा वेग जादा असण्याची गरज असते. दुसरी गोष्ट अशी की चंद्रच्या कक्षेत त्याला ढकलताना त्याचा कोन बदलणे गरजेचे आहे. चंद्रयान-3 ला पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असताना त्याची दिशा बदलणे गरजेचे आहे.
सहा दिवसांनी चंद्राच्या कक्षेत पोहचणार
ट्रांस-लूनर इंजेक्शनसाठी पहिल्यापासून तयार आणि लोड केलेल्या कमांडचा वापर केला जाईल. थ्रस्टर्स सुरु करण्याची प्रक्रीया पाच ते सहा तास आधीच सुरु केली जाईल. त्यामुळे चंद्रयान-3 चा कोन बदलण्यास मदत मिळणार आहे. थ्रस्टर्सच्या फायरिंगमुळे यानाला वेग मिळेल. चंद्रयान – 3 सरासरी 1.2 लाख किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुमारे 51 तासांचा वेळ लागत असतो. पृथ्वी आणि चंद्रादरम्यान 3.8 लाख किमीचे अंतर आहे.आज मध्यरात्री यानाचे थ्रस्टर्स सुरु करण्यात येतील त्यानंतर सहा दिवसांनी यान चंद्राच्या कक्षेत पोहचेल असे म्हटले जात आहे. मध्यरात्री इंजिन फायरिंग जेव्हा केले जाईल जेव्हा चंद्रयान पृथ्वीपासून 236 किमी अंतरावर असेल. ट्रांसलूनर इंजेक्शनसाठी चंद्रयानाचा वेग पृथ्वीच्या एस्केप वेलोसिटी 40,270 kmph पेक्षा जास्त हवा. त्यावेळी थ्रस्टर्स चालू करुन यानाचा वेग वाढविला जाईल.
खरी कसोटी कक्षेत पोहचल्यावर
चंद्र जुलै महिन्याच्या काळात पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे जुलै महिन्याच चंद्रावर जाण्याच्या अंतराळ मोहिमा आखल्या जातात. चंद्राच्या कक्षाजवळ पोहचणे केवळ चंद्रयान-3 मोहिमेचा एक भाग आहे. चंद्रयान-3 मोहिमेची खरी कसोटी यान चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर सुरु होणार आहे. एकदा चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहचले की यानाला 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित करावे लागेल. इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूलला 17 ऑगस्ट लॅंडींग मॉड्यूलपासून वेगळे करण्याची वेळ निश्चित केले जाईल. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 ला चंद्रयानवर लॅंडींग केले जाईल.
चांद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास
- 14 जुलै रोजी चांद्रयान-3 170 किमी x 36,500 किमीच्या कक्षेत प्रक्षेपित केले गेले.
- 15 जुलै रोजी प्रथमच कक्षा 41,762 किमी x 173 किमी इतकी वाढवण्यात आली.
- 17 जुलै रोजी कक्षा दुसऱ्यांदा 41,603 किमी x 226 किमी इतकी वाढवण्यात आली.
- 18 जुलै रोजी, कक्षा तिसऱ्यांदा 5,1400 किमी x 228 किमी पर्यंत वाढविण्यात आली.
- 20 जुलै रोजी, कक्षा चौथ्यांदा 71,351 x 233 किमी पर्यंत वाढविली.
- 25 जुलै रोजी, कक्षा पाचव्यांदा 1.27,609 किमी x 236 किमी पर्यंत वाढविली.
- 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि चंद्राच्या दिशेने जाईल.