loksabha election 2024 | लोकसभा निवडणूक मार्चमध्ये? सात ते आठ टप्प्यात मतदान? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत असे महत्वाचे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये जाहीर केली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत.

loksabha election 2024 | लोकसभा निवडणूक मार्चमध्ये? सात ते आठ टप्प्यात मतदान? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
election comissonImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 11:27 PM

नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना आखावी लागणार आहे. देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची उत्कंठा वाढली आहे. सत्ताधारी भाजपपासून सर्वच पक्ष आणि विरोधी पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुक कधी जाहीर होणार याची राजकीय पक्ष वाट पाहता आहेत. मात्र, त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत असे महत्वाचे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये जाहीर केली जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत.

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीच्या तारखांबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही तयार आहोत आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने मी सांगू इच्छितो की, आम्ही ओडिशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेण्यास तयार आहोत. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे, असे ते म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विधानामुळे निवडणूक आयोग मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. प्राप्त माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात सात ते आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच निवडणुकीचे निकाल येऊ शकतात. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणार आहे.

2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत 9 टप्प्यात मतदान झाले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था, संसाधनांची उपलब्धता आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन निवडणुका किती टप्प्यांत घ्यायच्या याचा निर्णय आयोगाला घ्यावा लागणार आहे.

भाजपला 370 जागा जिंकण्याचे आवाहन

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400+ जागा जिंकण्याचे आवाहन केले आहे. भाजपने प्रचारात आधीच आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीमधील घटकपक्ष कॉंग्रेसची साथ सोडून जात आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.