LPG सिलिंडरच्या किंमतीचा फॉर्म्युला, डॉलरचा रेट ते जीएसटी; जाणून घ्या- पॉईंट टू पॉईंट

एप्रिल-मे महिन्यात आतापर्यंत सिलिंडरच्या दरात 193.50 रुपयांची वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर किंमत वाढ-घसरणीच्या बातम्या नियमित सुरू आहेत. त्यामुळे नेमक्या सिलिंडरच्या किंमती ठरविणारं सूत्र जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

LPG सिलिंडरच्या किंमतीचा फॉर्म्युला, डॉलरचा रेट ते जीएसटी; जाणून घ्या- पॉईंट टू पॉईंट
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 6:00 PM

नवी दिल्लीः सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र (INFLATION RATE) झळांचा सामना करावा लागत आहे. वैयक्तिक तसेच व्यावसायिक प्रवासासाठी महत्वाच्या असणाऱ्या एलपीजीचे दर पुन्हा उंचावले आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज (गुरुवारी) 3.50 रुपयांची वाढ झाली. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमधील या महिन्यातील दुसरी दरवाढ ठरली आहे. गॅस कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राजधानी दिल्लीत बिगर-अनुदानित सिलिंडरची (NON-SUBSIDARY CYLINDER) किंमत 1,003 रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल-मे महिन्यात आतापर्यंत सिलिंडरच्या दरात 193.50 रुपयांची वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर किंमत वाढ-घसरणीच्या बातम्या नियमित सुरू आहेत. त्यामुळे नेमक्या सिलिंडरच्या किंमती ठरविणारं सूत्र जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. डॉलर विनिमय दर (DOLLAR EXCHANGE RATE) ते जीएसटी यांचा गॅस सिलिंडरच्या किंमतीवर होणारा नेमका परिणाम जाणून घेऊया-

दरवाढीचा ‘डॉलर’ इफेक्ट

भारतात एलपीजी सिलेंडरच्या किंमती मुख्यत्वे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर आणि आंतरराष्ट्रीय बेंचमार्क रेट यावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमती वाढल्यानंतर आणि रुपयाची घसरण नोंदविल्यानंतर देशांतर्गत बाजारात एलपीजीच्या किंमतीत वाढ होते. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढीनंतर रुपयाच्या घसरणीचा आलेख तीव्र झाला आहे. काल (बुधवारी) रुपयाची किंमत 17 पैशांच्या घसरणीसह 77.61 प्रति डॉलरच्या नीच्चांकी पातळीवर पोहोचली.

निर्यातदार देशांवर मदार

भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किंमती ‘इम्पोर्ट पॅरिटी प्राईस’ (IPP) वरुन निर्धारित होतात. आयपीपीचं कनेक्शन आंतरराष्ट्रीय एलपीजीच्या किंमतीसोबत आहे. भारतातील गॅस पुरवठा आयातीवर अवलंबून आहे. गॅस निर्यातदार देशांच्या एलपीजीच्या किंमतीवर देशांतर्गत किंमती निश्चित होतात. एफओबी (फ्री ऑन बोर्ड), समुद्रमार्ग वहन, इन्श्युरन्स, कस्टम शुल्क, पोर्ट शुल्क आदी किंमतीचा देखील सिलिंडरच्या किंमतीवर परिणाम होतो. या सर्व शुल्क डॉलरच्या स्वरुपात अदा केले जातात. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चे तेल व नैसर्गिक वायूत भाववाढ झाली आहे.

जीएसटी ते डीलर कमिशन:

भारताच्या चलन सुलभतेसाठी डॉलरचे रुपयांत रुपांतरण केले जाते. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर स्थितीत आहे. त्यामुळे एलपीजीच्या किंमती पूर्वीपेक्षा अधिक आहे. देशांतर्गत अन्य घटकही गॅसच्या किंमतीवर थेट परिणाम करतात. यामध्ये विपणन शुल्क, डीलर कमिशन तसेच जीएसटी सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.