देशात सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा कोणता? नाव ऐकून थक्क व्हाल!
टोलद्वारे सरकारला मोठे उत्पन्न मिळत असते. अनेकदा रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वसुल झाला तरी टोल वसुली चालूच राहाते. यावरुन अनेकदा आंदोलने देखील झाली आहेत. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप - 5 टोल प्लाझांची माहीती घेऊयात

जेव्हा आपण कारमधून कुठेतरी जात असतो, तेव्हा टोल प्लाझामध्ये थांबणे अनिवार्य असते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की प्रत्येक टोल प्लाझामध्ये थांबण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे? भारताच्या विकासासाठी आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी अनेक नियम आणि टोल शुल्क घेतले जातात. आपण अनेक टोल प्लाझा पाहिल्या असतील, पण तुम्हाला माहित आहे का, देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा कुठे आहे? या प्लाझाने किती कमाई केली आहे, आणि त्याचे गुपित काय आहे? चला, या रोचक गोष्टीबद्दल जाणून घेऊया!
भरठाणा टोल प्लाझा हा देशातील सर्वात व्यस्त टोल प्लाझा आहे, तसेच सर्वात वर्दळीचा मार्ग देखील आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये या टोल प्लाझाने सर्वाधिक कमाई केली होती. गेल्या आर्थिक वर्षात, भरठाणा टोल प्लाझावर ४७२.६५ कोटी रुपयांचा टोल जमा झाला. कार, जीप किंवा व्हॅनने प्रवास करणाऱ्यांना एकेरी प्रवासासाठी १५५ रुपये आणि दुतर्फा प्रवासासाठी २३० रुपये टोल भरावा लागतो. तसेच, बस किंवा ट्रकसाठी एकेरी प्रवासासाठी ५१५ रुपये आणि दोन्ही मार्गांसाठी ८८५ रुपये टोल आकारला जातो.
जाणून घ्या देशातील टॉप पाच टोल प्लाझा:
१. गुजरातमधील भरठाणा – देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा.




२. राजस्थानचा शाहजहांपूर टोल प्लाझा – दुसऱ्या क्रमांकावर असून, पाच वर्षांची कमाई १८८४ कोटी रुपये होती.
३. पश्चिम बंगालचा जलधुलागोरी टोल प्लाझा – तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची पाच वर्षांची कमाई १५३९ कोटी रुपये आहे.
४. उत्तर प्रदेशातील बडाजोर – चौथ्या स्थानावर असून, त्याची कमाई १४८१ कोटी रुपये आहे.
५. हरियाणाचा घारौंडा – पाचव्या स्थानावर असून, याची कमाई १३१४ कोटी रुपये आहे.