‘या’ राज्यात राहतात भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोक, आकडेवारी बघून बसेल धक्का
तुम्हाला माहिती आहे का? भारतामधील निम्म्याहून अधिक अब्जशीश एकाच राज्यामध्ये राहातात. हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे, गेल्या १०-११ वर्षांत अब्जाधीशांची संख्या दुपटीने वाढली आहे.

तुम्हाला माहिती आहे का? भारतामधील निम्म्याहून अधिक अब्जशीश एकाच राज्यामध्ये राहातात. हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे, गेल्या १०-११ वर्षांत अब्जाधीशांची संख्या दुपटीने वाढली आहे, आणि सध्या भारतात सुमारे १९१ अब्जाधीश आहेत. यामध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, यातील निम्म्याहून अधिक अब्जशीश एकाच राज्यातील आहेत.
एक आकडेवारी समोर आली आहे, जीने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात १९१ अब्जाधीशांपैकी १०८ एकाच राज्यातील आहेत. स्टॉकफाईचे संस्थापक अभिजित चोक्सी यांनी एक व्हायरल पोस्टद्वारे हा दावा केला आहे, व्यवसाय आणि वित्त क्षेत्रातील या वर्चस्वामागील रहस्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मग, ही अवस्था अशी होण्यामागील कथा काय आहे? एखाद्या राज्यातून एवढ्या मोठ्या संख्येने अब्जाधीश कसे येतात? हे राज्य अब्जाधीशांचा बालेकिल्ला कसं बनलं? हे जाणून घेऊयात.
येथे गुजरातबद्दल बोलले जात आहे आणि त्याचा आर्थिक परिणाम खूप मोठा आहे. चोक्सी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निदर्शनास आणले आहे की ही फक्त सुरुवात आहे. देशाच्या केवळ टक्के भूभाग व्यापूनही गुजरातचा भारताच्या एकूण निर्यातीमध्ये २५ टक्के वाटा आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक व्यापाराच्या दृष्टीने ही संख्या राज्यासाठी महत्त्वाची आहे. गुजराती लोकांचा असा विश्वास आहे की नोकऱ्या गरिबांसाठी आहेत, म्हणूनच मुले देखील व्यवसायात गुंततात, पैशाचे व्यवस्थापन करतात, व्यवसायात जोखीम पत्करतात आणि आव्हाने सोडवतात.
गुजरातचे काही मोठे अब्जाधीश
गुजरात हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींचे घर आहे आणि त्यांच्या यशोगाथा प्रेरणादायी आहेत. गुजरातच्या अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी, ज्यांची एकूण संपत्ती ₹ १.४ लाख कोटी आहे, मुकेश अंबानी, जे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत, त्यांची एकूण संपत्ती ₹ ८.१३ लाख कोटी आहे. निरमाचे संस्थापक करसनभाई पटेल यांची संपत्ती ₹ ३१,५०० कोटी होती. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती ₹ ९६,५०० कोटी आहे, कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची एकूण संपत्ती ₹ १.११ लाख कोटी आहे.