भारतातील कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आणि कोणत्या राज्याचा सर्वात गरीब ? आकडेवारी पाहून व्हाल आश्चर्यचकीत?

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने देशातील मुख्यमंत्र्‍यांच्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. यात देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आणि सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांची माहिती देण्यात आली आहे.

भारतातील कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आणि कोणत्या राज्याचा सर्वात गरीब  ? आकडेवारी पाहून व्हाल आश्चर्यचकीत?
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 10:34 PM

निवडणूकीला उभे रहाताना प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपली संपती शपथपत्राद्वारे जाहीर करावी लागते. त्यातून आपल्याला महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या संपत्तीचा घोषवारा कळत असतो. परंतू देशातील कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तसेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांची संपत्ती कमी आहे. या संदर्भात एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या ( एडीआर ) संस्थेने सोमवारी एक अहवाल सादर केला आहे. यात सीएमच्या संपत्ती संबंधी माहिती जाहीर करण्यात आली आहे.

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ?

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू देशाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची संपत्ती 931 कोटी रुपयांहून अधिक आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा क्रमांक संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  पेमा खांडू यांची संपत्ती 332 कोटी रुपयांहून अधिक आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे संपत्तीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 51 कोटी रुपये इतकी आहे.

देशाचे सर्वात गरीब मुख्यमंत्री

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची संपत्ती केवळ 15 लाख रुपये आहे. त्यानंतर जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची संपत्ती 55 लाख रुपये इतकी आहे. या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची संपत्ती 1.18 कोटी रुपये आहे. गरीब मुख्यमंत्र्‍यांच्या यादीत पिनराई यांचा क्रमांक तिसरा आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील मुख्यमंत्र्‍यांची सरासरी संपत्ती 52.59 कोटी रुपये आहे. भारताचे 2023-2024 साठीचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNI) अंदाजे 1,85,854 रुपये होते. तर मुख्यमंत्र्‍यांचे सरासरी वैयक्तिक उत्पन्न 13,64,310 रुपये आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा ते 7.3 पट अधिक आहे.

देशाच्या 31 मुख्यमंत्र्‍यांची एकूण संपत्ती किती ?

देशाच्या 31 मुख्यमंत्र्‍यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर 180 कोटीचे कर्ज देखील आहे. अहवालानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यावर 23 कोटी रुपये आणि नायडू यांच्यावर 10 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. 13 (42 टक्के ) मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या विरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती घोषीत केली आहे. तर 10 (32 टक्के ) मुख्यमंत्र्‍यांनी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. त्यात खूनाचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी आणि धमक्या देणे अशी प्रकरणे आहेत. देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोन महिला मुख्यमंत्री आहेत. त्यात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा समावेश आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....