Breaking : ‘…म्हणून WHOच्या अहवालात 47 लाख कोरोना बळी!’ सरकारमधील सूत्रांकडून धक्कादायक कारण उघडकीस

47 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO कडून करण्यात आलेला होता. हा दावा खोटा असल्याचं भारतानं स्पष्टीकरणात म्हटलं होतं.

Breaking : '...म्हणून WHOच्या अहवालात 47 लाख कोरोना बळी!' सरकारमधील सूत्रांकडून धक्कादायक कारण उघडकीस
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:59 PM

नवी दिल्ली : WHO ने (World Health Organisation) भारतात कोरोना महामारीदरम्यान तब्बल 47 लाख लोकांचा मृत्यू (Corona Death Report) झाल्याचा दावा केला. मात्र हा दावा चुकीचा असल्याचं सरकारने म्हटलं. सरकारी आकडेवारीमध्ये आणि WHOने दिलेल्या आकडेवारी इतकी तफावर कशी? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित करण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या धक्कादायक खुलाशानं खळबळ उडाली आहे. सरकारमधील वरीष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार WHO ने दाखवलेल्या कोरोना बळींच्या अहवालामागे काही फार्मा कंपन्यांचा (Pharma Companies) हात आहे, संशय व्यक्त करण्यात आलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबतचं कारणही सांगण्यात आलंय. जागतिक बाजारातील काही फार्मा कंपन्यांना भारतात कोविड प्रतिबंधक लस विकण्यास मनाई करण्यात आली होती. या कंपन्यांकडूनच चुकीची पद्धत वापरुन भारतात जास्त कोविड बळी गेल्याचा आकडा फुगवून दाखवण्यात आला, असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

विशेष म्हणजे हाच आकडा WHOने अहवालात मांडला असल्याची टीका करण्यात आली आहे. WHO ने दिलेल्या अहवालात जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यानची कोरोना मृतांची आकडेवारी जारी केली होती. या आकडेवारीनुसार 47 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा WHO कडून करण्यात आलेला होता. हा दावा खोटा असल्याचं भारतानं स्पष्टीकरणात म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

सरकारी आकडेवारी काय?

भारतात कोव्हिडमुळे 5 लाखांहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत कोव्हिडमुळे 4,81,000 मृत्यूची झाल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली होती. मात्र डब्लूएचओच्या अंदाजानुसार हा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दसपट असल्याचा दावा करण्यात आलेला. डब्लूएचओच्या मते, जागतिक स्तरावर कोव्हिडमुळे जे मृत्यू झालेत त्यापैकी जवळपास एक तृतीयांश मृत्यू भारतात झालेत, असं सांगण्यात येत होतं.

सरकारनं काय म्हटलं?

WHO नं कोरोना बळींच्या दाखवलेल्या आकडेवारीच्या समीकरणावर भारत सरकारनं बोट ठेवलंय. जागतिक आरोग्य संघटेनं कोरोना बळींचा आकडा मोजण्यासाठी वापरलेलं मॉडेलच शंकास्पद असल्याचं सरकारचं म्हणणंय.

देशात जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणारी अत्यंत सक्षम अशी यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेकडून मिळालेल्या डाटानुसार आम्ही आकडेवारी जाहीर केली आहे. मग असे असताना डब्लूएचओच्या आकडेवारीमध्ये एवढी तफावत कशी आढळून आली. याचाच अर्थ जागतिक आरोग्य संघटना कोरोनामुळे झालेले मृत्यू मोजण्यासाठी ज्या गणितीय मापन पद्धतीचा उपयोग करत आहे, ती शंकास्पद आणि वास्तवापासून भरकटलेली वाटत असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंचं कोरोनावर मोठं वक्तव्य : पाहा व्हिडीओ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.