Traditional Medicine : पारंपरिक औषध केंद्र ठरणार गेमचेंजर, अ‍ॅलोपॅथीला टक्कर; WHO चं गुजरातमध्ये सेंटर

संपूर्ण जगातील एकमेव केंद्र ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या उपचार पद्धतीत वेगळेपण सिद्ध करून परंपरागत औषधांचं प्रसार केंद्र महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

Traditional Medicine : पारंपरिक औषध केंद्र ठरणार गेमचेंजर, अ‍ॅलोपॅथीला टक्कर; WHO चं गुजरातमध्ये सेंटर
आयुर्वेदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:15 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील जामनगर स्थित जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) पारंपरिक औषध केंद्राचं (GLOBAL TRADITIONAL MEDICINE CENTER) (जीएसटीएम) भूमिपूजन केले जाणार आहे. संपूर्ण जगातील एकमेव केंद्र ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या उपचार पद्धतीत वेगळेपण सिद्ध करून परंपरागत औषधांचं प्रसार केंद्र महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. नेमकं जागतिक केंद्राचं महत्व काय? जागतिक दृष्टीने भारतासाठी कशाप्रकारे महत्वाचे ठरेल याविषयी जाणून घेणं सर्वार्थानं महत्वाचं आहे. भारतात गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक उपचार पद्धती अस्तित्वात आहे. छोट्यापासून मोठ्या आजारांवर पारंपरिक औषधांचा वापर केला जातो. इतकंच नव्हे जागतिक महामारी कोविड काळात (COVID CRISIS) पारपंरिक उपचार पदधतीचा देखील आधार घेण्यात आला होता. भारताचा ऐतिहासिक मौल्यवान ठेवा असलेली पारंपरिक औषधं जगासमोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे.

194 देशांत विस्तार

जामनगर मध्ये उभारण्यात येणाऱ्या केंद्रात पारपंरिक औषधांची वैज्ञानिक पद्धतीने निर्मिती केली जाणार आहे. जगभरातील अन्य देशांना देखील याचा थेट लाभ उपलब्ध होणार आहे. केवळ आयुर्वेदिक औषधांवरच नव्हे तर अक्यूप्रेशर आणि औषधी गुणधर्मयुक्त पदार्थांवर देखील संशोधन केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक पी.के सिंह यांनी केंद्राच्या संरचनेविषयी भाष्य केलं आहे. गेल्या अनेक शतकांपासून परंपरागत औषधांचा वापर केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 194 सदस्य देशांपैकी 70 देशांतील सरासरी 80 टक्के लोक त्यांचा उपयोग करतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

पारंपरिक औषध जागतिक केंद्र गुजरातमधे जामनगर इथं उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आयुष मंत्रालयाअंतर्गत हे केंद्र होणार असून ते जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न असणार आहे. पारंपरिक औषधांचा सुयोग्य वापर, दर्जा, क्षमता, सुरक्षितता, आणि उपलब्धता या आघाड्यांवर हे केंद्र काम करील. औषधनिर्मितीमधे, मानक निश्चिती, तंत्रज्ञान विकास, परीक्षण, आणि माहिती संकलनाच्या कार्यपद्धती तयार करणं इत्यादी कामं या केंद्रात होतील.

महत्वाची ठळक वैशिष्ट्ये

• जागतिक आरोग्य संघटनेचं पारंपरिक औषध केंद्र जगातील पहिलं केंद्र ठरणार आहे • पारपंरिक औषधांचे क्षमतावर्धन आणि संशोधनाला चालना हे मुख्य उद्दिष्ट • सर्वंकष, निरोगी उपचार पद्धतीचा विकास हे मुख्य लक्ष्य

इतर बातम्या :

Hair Cutting : महागाईच्या झळा… आता मुंबई आणि देशभरात हजामत आणि केस कापणं महागणार

Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.