बॉम्ब बनवताना हात गमावला म्हणून नाव पडले टुंडा, 1993 बॉम्बस्फोट मालिकेसह 40 स्फोटातील आरोपीची सुटका

टुंडा याने बाबरी पतनाचा बदला घेण्यासाठी देशातील पाच शहरात ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट केले होते. त्याच्यावर देशात 33 गंभीर गुन्हे दाखल आहेत. देशातील 40 छोट्या मोठ्या बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचा पोलीसांचा आरोप आहे.

बॉम्ब बनवताना हात गमावला म्हणून नाव पडले टुंडा, 1993 बॉम्बस्फोट मालिकेसह 40 स्फोटातील आरोपीची सुटका
abdul karim alias tundaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 3:40 PM

जयपूर | 29 फेब्रुवारी 2024 : मुंबईतील 12 मार्च 1093 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेसह देशातील पाच मोठ्या शहरातील बॉम्बस्फोट प्रकरणातील अब्दुल करीम ऊर्फ आरोपी टुंडा याला अजमेर टाटा कोर्टाने निर्दोष सोडले आहे. तसेच अन्य दोन अतिरेकी इरफान आणि हमीदुद्दीन यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. टुंडा याच्या सुटकेला सरकारी पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात टुंडा, इरफान आणि हमीउद्दीन या तिघा आरोपींना सकाळी 11 वाजता अजमेर टाटा कोर्टात हजर करण्यात आले होते.

लखनऊ, कानपूर, हैदराबाद आणि सुरतमध्येही बॉम्बस्फोट

या तिघा आरोपींनी सहा डिसेंबर 1993 मध्ये लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे. 20 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारी 2004 रोजी टाडा कोर्टाने 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना निर्दोष मुक्त केले तर जयपूर तुरुंगात बंद असलेल्या उर्वरितांची शिक्षा कायम केली होती.

कोण आहे अब्दुल करीम टुंडा

टुंडाचा जन्म 1943 मध्ये जुन्या दिल्लीच्या छत्तालाल मियां येथे झाला होता. त्याचे वडील लोहाराचे काम करायचे. टुंडा याच्या उपद्रवाला कंटाळुन त्यांनी जुनी दिल्ली सोडून उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील पिलखुआ येथे बस्तान हलविले. येथे टुंडा याने भावासोबत सुतारकाम केले. त्याचे लग्न जरीना नामक महिलेशी झाले. टुंडा याचे घरात लक्ष नव्हते. अनेक दिवस तो घरातून गायब असायचा. साल 1981 मध्ये तो जरीनाला सोडून गायब झाला. परत आला तेव्हा त्याच्या सोबत अहमदाबादची मुमताज होती.

पाकच्या आयएसआयचे प्रशिक्षण

टुंडा याने पाकिस्तानी आयआएआय या गुप्तहेर संघटनेकडून प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. टुंडा याच्या विरोधात दिल्लीच्या विविध पोलिस ठाण्यात 21 आणि गाजियाबाद येथे 13 तसेच देशातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात साल 1956 मध्ये पहिली चोरीची केस दाखल झाली होती. त्यावेळी त्याचे वय अवघे ….होते. मुंबईच्या डॉक्टर जलील अन्सारी, नांदेडच्या आझम गोरी आणि टुंडा याने तंजीम इस्लाम ऊर्फ मुसलमीन संघटना तयार करुन बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 ला पाच शहरातील ट्रेनमध्ये ब्लास्ट केले होते.

टुंडावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

1993 ला पाच मोठ्या शहरात सिरीयल बॉम्बस्फोट झाल्यानंतर 1996 मध्ये दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला होता.या प्रकरणात टुंडावर आरोप ठेवण्यात आला. त्यानंतर त्याच्याविरोधात रेडकॉर्नर नोटीस बजावण्यात आली. बॉम्ब बनविताना ब्लास्ट झाल्याने त्याचा एक हात अधू झाला होता. त्यानंतर त्याचे नाव अब्दुल करीम ऐवजी टुंडा पडले. त्याच्यावर 33 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1997-98 मधील सुमारे 40 बॉम्बस्फोटांत टुंडा सामील आहे. पोलिसांनी टुंडाला नेपाळ सीमेवरुन अटक केली होती.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.