VIRAL NEWS : मुख्यमंत्र्याची महिला अधिकारी चर्चेत, एका दिवसात 5 कोटी रुपयांचे 26 फ्लॅट खरेदी

मुख्यमंत्र्यांकडे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला अधिकारी एका दिवसात 5 कोटी रुपयांचे 26 फ्लॅट खरेदी केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांचं प्रकरण उजेडात आल्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.

VIRAL NEWS : मुख्यमंत्र्याची महिला अधिकारी चर्चेत, एका दिवसात  5 कोटी रुपयांचे 26 फ्लॅट खरेदी
jyoti bhardwajImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 10:37 AM

नवी दिल्ली : राज्यात सरकार विकास करीत असल्याचे मुख्यमंत्री (CM) वारंवार मीडियाला सांगत असतात. परंतु सध्या एक असं प्रकरण उजेडात आलं आहे की, मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या (Central Goverment) अडचणी वाढण्याची शक्यता लोकं बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने (jyoti bhardwaj) एका दिवसात 5 कोटी रुपयांचे 26 फ्लॅट खरेदी केले आहेत. सरकार किती भ्रष्टाचार करीत आहे अशी ओरड विरोधकांनी सुरु केली आहे. आता महिला अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात देशात निवडणुका होणार आहेत. त्याच्या आगोदर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे सरकारला मोठी अडचण निर्माण झाली आहे.

हे प्रकरण राजस्थान राज्यातील आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे महिला अधिकारी काम करीत आहे. त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव ज्योति भारद्वाज असं आहे. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे त्या महिला अधिकाऱ्याच्या नावावर आता १५ घरं आहेत. तर इतर ११ घर त्यांच्या मुलाच्या नावावर आहेत. घर खरेदीची प्रक्रिया फक्त दोन दिवसात केली आहे. तीन दिवसात घराची नोंदणी सुध्दा केली आहे.

हे सुद्धा वाचा

खोटी माहिती दिली

घर खरेदी केल्यानंतर अधिकाऱ्याने बँकेला काही चेक दिले होते, अद्याप त्यातून कसल्याची प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत. अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता किती आहे, याची सरकारला प्रत्येकवर्षी माहिती द्यायची असते. त्या महिला अधिकाऱ्याने तिच्या नावावर दोन घरं असल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पतीच्या नावावर एक घर आहे अशी माहिती दिली आहे. त्याचबरोबर घरांचे हप्ते त्यांच्या पगारातून जात आहेत असं म्हटलं आहे.

कोण आहेत ज्योति भारद्वाज

ज्योती भारद्वाज सध्या जयपूरच्या शासकीय सचिवालयातील कार्मिक विभागाच्या स्टोअर विभागात आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची बदली आतापर्यंत चांगल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी खरेदी केलेल्या एका घराची किंमत साधारण लाखो रुपये आहे.

ही सगळी घरं मानसरोवर लिंक रोड येथील जेडीए मार्केटमधील बोनी बिल्डटेकचे डायरेक्टर अजय सिंह यांच्याकडून खरेदी केले आहेत. ही सगळी घरं खरेदी करताना कसल्याची प्रकारचं लोन केलेलं नाही. पाच करोड रुपयांचं पेमेंट आलं कुठून हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्या बिल्डरकडून दिलेले चेक अद्याप बँकेत तसेच पडून आहेत. ज्यावेळी बिल्डरशी संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी फ्रॉड झाला आहे एवढीचं माहिती दिली आहे.

ज्योति भारद्वाज म्हणाल्या की, बोनी बिल्डर आमच्यात एक व्यवसायिक करार झाला होता. या सगळ्या गोष्टीची कल्पना माझ्या नवऱ्याला होती. माझ्या नवऱ्याशी ज्यावेळी माझं बोलणं झालं. त्यावेळी मी काही चेक बिल्डरला दिले होते. त्यावेळी त्यांच्या नवऱ्याने सांगितलं होतं की, हा आमच्या दोघांमधला व्यवहार आहे.

हे प्रकरण उजेडात आल्यापासून सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर या प्रकरणाविषयी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत एक बैठक झाली आहे. त्याबरोबर आरोप झालेल्या महिला अधिकाऱ्याने खरेदी केलेल्या घरांची माहिती दिली होती का ? याची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यावरती कसलीही करावाई झालेली नाही.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.