राजकारणासाठी कुटुंबाचा त्याग करणारे भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार, जाणून घ्या त्यांच्या दोन्ही पत्नींविषयी…

Bhagwant Mann : राजकारणासाठी कुटुंबा त्याग करणारे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार

राजकारणासाठी कुटुंबाचा त्याग करणारे भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार, जाणून घ्या त्यांच्या दोन्ही पत्नींविषयी...
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 4:56 PM

मुंबई : एकेकाळी राजकारणासाठी कुटुंबाचा त्याग करणारे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आता पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहेत. 48 वर्षीय भगवंत मान उद्या म्हणजेच 7 जुलैला चंदीगडमध्ये डॉ. गुरप्रीत कौर (Dr. Gurprit Kaur) यांच्यासोबत साता जन्मासाठी वचनबद्ध होणार आहेत. भगवंत मान त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहेत. भगवंत मान यांच्या आईची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनासारखंच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही सेट व्हावं. म्हणूनच त्याच्या आई आणि बहिणीने स्वतः त्यांच्यासाठी या मुलीची निवड केली. भगवंत मान डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी घरी एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. कॉमेडियनमधून पंजाबचे मुख्यमंत्री असा प्रवास असणारे भगवंत मान यांचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊयात…

पहिल्या पत्नी इंद्रप्रीत कौर

भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नी इंद्रप्रीत कौर या आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. भगवंत आणि इंद्रप्रीत यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. “भगवंत मान यांनी भारत सोडून कॅलिफोर्नियाला गेले आणि राजकारण सोडलं तर मी घटस्फोटाचा अर्ज मागे घेईल”, अशी अट मान यांच्या पहिल्या पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी ठेवली होती. पण भगवंत मान यांनी कुटुंबाचा त्याग केला आणि राजकारण निवडलं. भगवंत मान यांची पूर्व पत्नी इंद्रप्रीत कौर त्यांच्या दोन मुलांसह कॅलिफोर्नियामध्ये राहतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघंही अजून शिक्षण घेत आहेत. दिलशान मान (17 वर्षे) आणि सीरत कौर मान (21 वर्षे) अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.

दुसऱ्यांदा लग्नगाठ

भगवंत मान गुरुवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. 48 वर्षीय भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. मान डॉक्टर गुरप्रीत कौरशी लग्न करणार आहे. हे लग्न गुरुवारी चंदीगडमध्ये होणार आहे. भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील चंदीगडला जाणार असल्याची माहिती आहे. घटस्फोटाच्या 7 वर्षांनंतर भगवंत मान यांनी आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

भगवंत मान यांच्या आईची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनासारखंच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही सेट व्हावं. म्हणूनच त्याच्या आई आणि बहिणीने स्वतः त्यांच्यासाठी या मुलीची निवड केली. भगवंत मान डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी घरी एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील.

भगवंत मान 2011 मध्ये राजकारणात आले. 2014 मध्ये ते पहिल्यांदाच आपच्या तिकिटावर संगरूरमधून खासदार झाले. त्यावेळी त्यांच्या पहिल्या पत्नी इंद्रजीत कौर यावेळी प्रचार करताना दिसल्या. भगवंत मान यांनी 2019 मध्येही संगरूरमधून निवडणूक जिंकली होती. पुढे 2022 मध्ये ते पंजाबमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. भगवंत मान यांनी 16 मार्च 2022 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांचा मुलगा आणि मुलगीही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.