Jugraj Singh : लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारा तरुण शेतकरी कोण? घरची परिस्थिती काय?
जुगराज सिंहने (Jugraj Singh) थेट लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवल्याने पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील गावात एकच उत्साह आहे.
चंदीगड : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागल्याचं जगाने पाहिलं. कृषी कायद्यांना विरोध करत दोन महिने शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला थेट लाल किल्ल्यावर कूच केली. इतकंच नाही तर लाल किल्ल्यावर तिरंगा झेंड्याच्या बाजूला खालसा झेंडा (khalistan flag) फडकवला. हिंसक आंदोलन आणि तोडफोडप्रकरणी पोलीस आता कारवाई करत आहेत. हा झेंडा फडकवणारा जुगराज सिंह (Jugraj Singh) हा मूळचा पंजाबचा. बीबीसीने जुगराजच्या गावी जाऊन त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेतली. (Jugraj Singh Punjabs Tarn Taran youth who hoisted flag at Red Fort during Farmers tractor rally )
जुगराज सिंहने थेट लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवल्याने पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील गावात एकच उत्साह आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करुन धरपकड सुरु केल्याने, जुगराजच्या गावाचा उत्साह चिंतेत बदलला आहे.
आता तर जुगराजचा पत्ताच नाही. जुगराजचे आई-वडील गाव सोडून गेले आहेत. आता पोलीस आणि मीडियाचा ‘सामना’ करण्यासाठी गावात फक्त जुगराजचे आजी-आजोबा उरले आहेत.
23 वर्षांचा जुगराज सिंह
जुगराज सिंह हा 23 वर्षांचा तरुण पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यातील रहिवाशी. याच जुगराजने 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होऊन, लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवला होता.
जुगराजच्या आजोबांना याबाबत विचारलं असता, नातवाच्या पराक्रमावर शेतकरी आजोबाला अभिमान आहे. “मला खूपच अभिमान आहे, ये बाबे दी मेहर है अर्थात गुरुंची कृपा आहे” असं ते म्हणाले.
आजोबा महल सिंह यांनी जुगराज हा खूप चांगला मुलगा असल्याचं सांगितलं. जी घटना घडली तो नेमका काय प्रकार होता, हे आपल्याला माहिती नाही. मात्र आयुष्यभरात जुगराजने आपल्याला कधीही तक्रारीची संधी दिली नाही, असं महलसिंह सांगतात.
जुगराच्या गावकऱ्यांचं म्हणणं काय?
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी अनेकवेळा जुगराजच्या घरावर छापेमारी केली आहे. मात्र त्यांना प्रत्येकवेळी रिकाम्या हातीच परतावं लागलं. कारण जुगराज आणि त्याचे आई-वडील गावात नाहीत. बहुतेक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जुगराज एक मेहनती आणि प्रामाणिक मुलगा आहे.
जुगराज हा 23 की 24 जानेवारीला दिल्लीला गेला. त्यानंतर तो गावकऱ्यांना थेट टीव्हीवरच 26 जानेवारीला दिसला. लाल किल्ल्यावरील खांबावर चढलेला जुगराज आहे हे अनेकांनी ओळखलंही नाही. जुगराज एक साधा मुलगा आहे. त्याला कुणीतरी भडकवलं असेल. त्यामुळेच त्याने लाल किल्ल्यावर चढून झेंडा लावला असावा, असं गावातील जगजीत सिंह सांगतात. या आंदोलनाला परदेशातून फंड मिळत असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
दोन-तीन एकर जमीन
जुगराच्या कुटुंबीयाकडे मोठ्या मुश्किलीने दोन-तीन एकर जमीन असेल. त्याचं कुटुंब आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आहे. काही वर्षापूर्वी जुगराज हा चेन्नईत एका फॅक्टरीत काम करत होता. जुगराजला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघींची लग्न झाली आहेत तर लहान बहीण कुटुंबासोबत असते.
शेतकरी आंदोलन
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आक्रमक रुप धारण केलं. मोदी सरकारने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिली 26 जानेवारीला हिंसक वळण लागलं. दिल्ली सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला. त्यापैकी आयटीओ या ठिकाणी असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आपला पूर्वनियोजित ट्रॅक्टर मार्चचा मार्ग बदलत लाल किल्ल्यावर पोहचले. या ठिकाणी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला.
संबंधित बातम्या
Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?
(Jugraj Singh Punjabs Tarn Taran youth who hoisted flag at Red Fort during Farmers tractor rally )