छोट्या-छोट्या चोऱ्या ते 700 पेक्षा अधिक शार्पशूटरची गँग, कोण आहे कॅनडामधून अटक करण्यात आलेला अर्श डाला?
खलिस्तानी दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्डेट गँगस्टर अर्श डाला याला कॅनडात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.
खलिस्तानी दहशतवादी आणि भारताचा मोस्ट वॉन्डेट गँगस्टर अर्श डाला याला कॅनडात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तो गेल्या चार वर्षांपासून आपल्या पत्नीसह कॅनडात राहत होता.कॅनडात राहून तो भारताविरोधी दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया करत होता.तो खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या टोळीचा सदस्य होता. काही दिवसांपूर्वीच हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली आहे, आता अर्श डाला याला देखील पोलिसांनी अटक केलं आहे. डाला याचं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी असलेलं कनेक्शन देखील समोर आलं आहे. एनआयए, दिल्ली पोलीस आणि पंजाब पोलिसांच्या मोस्ट वॉन्डेड यादीत त्याचा समावेश होता. त्याच्यासाठी काम करणारे 700 पेक्षा अधिक शार्पशूटर भारतात सक्रिय आहेत.
अर्श डाला याचा जन्म पंजाबच्या मोगा गावामध्ये झाला.त्याचं पूर्ण नाव अर्शदीप सिंह डाला आहे, अल्पवयीन असतानाच त्यानं गुन्हेगारी क्षेत्रात आपलं पाऊलं ठेवलं. सुरुवातीला छोट्या-छोट्या चोऱ्या करणारा डाला हा त्यानंतर किडनॅपिंग, हफ्ता वसुली, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे करू लागला. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारीच्या कृत्यांचा आलेख वाढत गेला. त्याच्यावर अनेक हत्येचा प्रयत्न, हत्या असे गुन्हे दाखल झाले.2018 च्या दरम्यान तो कॅनडामध्येच असणारा गँगस्टर आणि लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सदस्य गोल्डी बराड याच्या संपर्कात आला.गोल्डीच्या इशाऱ्यावर त्याने पंजाबमध्ये दहशतवादी करावायांना सुरुवात केली.
त्यानंतर अर्शदीप सिंह डाला हा खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या संपर्कात आला. निज्जर याने अर्शदीप सिंह डालाच्या साथीनं एक तीन सदस्यीय खलिस्तानी टायगर फोर्सची स्थापना केली. त्याच वर्षी निज्जरच्या सांगण्यावरून मोगामध्ये राहणाऱ्या सनशाईन क्लॉथ स्टोअरचे मालक तेजिंदर उर्फ पिंका यांची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये अर्शदीप सिंह डाला याचा हात असल्याचं समोर आलं. तसेच पाकिस्तानच्या मदतीनं दहशतवादी कारवायाचा प्लॅन बनवल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे, अखेर त्याला आता अटक करण्यात आलं आहे.