कोण आहेत साराह सनी ? देशातील पहिल्या मुक-बधीर महिला वकीलाने रचला इतिहास
देशातील पहिली मुक-बधीर वकील म्हणून साराह सनी यांनी नवा इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांकेतिक भाषेत युक्तीवाद करुन नवा पायंडा पाडला आहे.
नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता जरा एक पत्थर तो तबियत से उछालो यारो असे म्हटले जाते. म्हणजे जगात अशक्य असे काहीच नाही केवळ प्रयत्नांची शिकस्त हवी..गेल्या महिन्यात 22 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीसच्या खंडपीठासमोर पहिल्यांदा एक आगळी सुनावणी झाली. या सुनावणीत इतिहासात प्रथमच एका मूक-बधीर महिला वकीलाने सांकेतिक भाषेत आपल्या अशिलाची बाजू मांडली. या मुक-बधीर वकीलाच्या मदतीसाठी दुभाषक म्हणून सौरव रॉयचौधरी यांनी काम पाहीले. व्हर्च्युअल झालेल्या या सुनावणीत आपल्या प्रकरणाचा युक्तीवाद करून वकील साराह सनी या अनेकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरल्या आहेत.
सुरुवातीला ऑनलाईन कोर्टचे मॉडरेटरने दुभाषाला व्हिडीओ ऑन करण्याची परवानगी दिली नाही. परंतू मुख्य न्यायाधीशांनी परवानगी दिल्यानंतर त्यालाही व्हर्च्युअल कोर्टात विंडोत येण्याची परवानगी मिळाली. साराह सनी यांच्या साठी ही सारी व्यवस्था एडव्होकेट ऑन रेकॉर्ड संचिता एन यांनी केली होती. दिव्यांगाना संधी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय.चंद्रचुड यांचा हा प्रयत्न मैलाचा दगड मानला जात आहे.
कौन आहेत साराह सनी ?
साराह लहानपणापासून ऐकू आणि बोलू शकत नाहीत. परंतू त्यांच्या पालकांनी दिलेल्या पाठींब्याने साराह यांनी हे यश मिळविले आहे. साराह यांनी बंगळुरुच्या सेंट स्टीफन कॉलेज ऑफ लॉमधून एलएलबीची पदवी मिळविली आहे. ती तिचे वरिष्ठ संचिता याच्या मार्गदर्शनाखाली सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करीत आहे.
बीबीसीच्या बातमीनूसार लॉ पास केल्यानंतर साराह यांनी कर्नाटक येथील जिल्हा कोर्टातून आपल्या करीयरला सुरुवात केली. परंतू तेव्हा जजनी त्यांनी दुभाषक उपलब्ध करू दिला नाही. तेव्हा त्यांनी असा आक्षेप घेतला की दुभाषकाला कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे ते युक्तीवाद करु शकत नाहीत. तेव्हा साराह सनी लिहून आपला युक्तीवाद करीत असे.