कोण आहेत सुरेखा यादव ? आशियातील पहिल्या महिला लोको पायलटना मोदी यांच्या शपथविधीचे आवतण

एनडीएचे तिसऱ्या टर्मचे सरकार रविवार 9 जून रोजी शपथ घेत आहे. पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनात विविध देशांच्या प्रमुखांसोबत रेल्वेच्या महिला लोकोपायलटना देखील आवतण मिळाले आहे.

कोण आहेत सुरेखा यादव ? आशियातील पहिल्या महिला लोको पायलटना मोदी यांच्या शपथविधीचे आवतण
SUREKHA YADAVImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 1:59 PM

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकात एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर लागोपाट तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. मोदी आणि त्यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी येत्या 9 जून 2024 ला सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहूण्यांना आमंत्रित केले आहे. या सोहळ्याला आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदेभारतचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव त्या दहा लोको पायलट मध्ये सामील आहेत, ज्यांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी असलेल्या सुरेखा यादव या 1988 मध्ये भारताच्या पहिल्या महिल्या ट्रेन ड्रायव्हर बनल्या. त्यांना या साहसी क्षेत्राची निवड करून यशस्वीपणे कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. त्या सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सोलापूर वंदेभारतच्या देखील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. सुरेखा यादव या खूपच मितभाषी असून फारशा मिडीयाशी बोलत नाहीत. आशिया खंडातील पहिली महिला चालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा यादव यांनी असे क्षेत्र निवडले जेथे सर्वसाधारण महिला नोकरी करायला फारशा उत्सुक नसतात. आपल्या कुटुंबाने सहकार्य केल्याने ही नोकरी करु शकलो असे त्या म्हणतात. हा जॉब खूपच जबाबदारीचा आहे. त्यामुळे घरातील लोकांचे चांगले सहकार्य मिळते. वंदे भारत चालविण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याबद्दल आपण भाग्यशाली असल्याचे त्या म्हणतात. महिलांना त्यांना हवे ते क्षेत्र निवडावे, घाबरु नये. केवळ मनात जिद्द ठेवावी असा सल्ला त्या देतात.

वंदे भारत चालविणाऱ्या सुरेखा यादव यांनी सुरुवातीला मालगाडी ड्रायव्हरचे काम केले. त्यानंतर लांबपल्ल्यांच्या गाड्या चालविल्या. त्यानंतर दहा वर्षे मुंबईतील उपनगरीय लोकल चालविण्याचे कठीण काम केले आहे. नोकरीच्या सुरुवातीला पाच वर्षे सहायक लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांनी काम केले आहे. त्यानंतर मालगाडी चालविण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. वंदे भारत चालविण्यापूर्वी बडोद्यात त्यांना आठ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. साल 2000 मध्ये मुंबईत उपनगरीय लोकल चालविली तेव्हा आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट म्हणून बिरुद त्यांना लागले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पती रिटायर झाले आहेत. तर दोन्ही मुलांनी इंजिनियर करुन त्यांची लग्नं झाली असल्याने जबाबदारी सुटका झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता लवकरच त्या निवृत्त होत आहेत.

Vande Bharat loco pilots Surekha yadav to attend the Prime Minister’s oath taking ceremony –

कोण आहेत सुरेखा यादव ?

सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 मध्ये सातारा येथील सोनाबाई आणि रामचंद्र भोसले यांच्या घरी झाला. त्यांचे वडील लहान शेतकरी होते. सुरेखा त्यांच्या पाच बहिण भावंडात सर्वात मोठी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथे झाले. त्यांनी शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक प्रशिक्षणात प्रवेश घेतला. बीएस्सी नंतर कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून सुरेखा यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्या रेल्वेत जॉईंट झाल्या.

रेल्वेच्या या अधिकाऱ्यांना आमंत्रण

मध्य रेल्वेच्या लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम सेंट्रल रेल्वेच्या प्रीती साहू, उत्तर पूर्व रेल्वेच्या सिरीनी श्रीवास्तव, दक्षिण रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट ऐश्वर्या मेनन, दक्षिण-पूर्व रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट टिरके, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या स्नेह सिंह बघेल, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या ललित कुमार, उत्तर रेल्वेचे सुरिंदर पाल सिंह, उत्तर फ्रंट रेल्वेचे सत्यराज मंडल आदी रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी यांच्या शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.