WITT 2025: चित्रपट बनवण्यात सर्वात महत्वाचा भाग कोणाचा, अमित साध अन् जिम सरभ यांनी दिले कमालीचे उत्तर

| Updated on: Mar 29, 2025 | 9:41 AM

फूंक 2 या चित्रपटापासून अमित साध याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सुमारे 20 चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो ओटीटीत काम करतो. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. तर जिम सरभ याने नीरजा, राब्ता, फोटोग्राफ, पद्मावत, संजू, हाउस अरेस्ट, गंगूबाई काठियावडी आणि कुबेरा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

WITT 2025: चित्रपट बनवण्यात सर्वात महत्वाचा भाग कोणाचा, अमित साध अन् जिम सरभ यांनी दिले कमालीचे उत्तर
अमित साध अन् जिम सरभ
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us on

WITT 2025: टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत काम करणारे दिग्गज लोक आले. स्टारडम का हायवे या स्पेशल सेगमेंटमध्ये अभिनेता अमित साध आणि जिम सरभ सहभागी झाले. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आली. त्याचवेळी दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते विजय देवरकोंडा आले. इंडियाज गॉट टॅलेंट – नाऊ ॲट द ग्लोबल स्टेजचा भाग म्हणून जिम सरभ आणि अमित साध यांनी भारतीय सिनेमाच्या सामर्थ्याबद्दल मत व्यक्त केले.

कार्यक्रमात जिम सरभ आणि अमित साध यांनी अनेक गोष्टींबद्दल दिलखुलास चर्चा केली. WITT 2025 मध्ये बोलताना अमित आणि जिम यांनी दक्षिण विरुद्ध बॉलीवूडचे युद्ध आणि OTT वरील सेन्सॉरशिप यासारख्या खास गोष्टींबद्दल मत व्यक्त केले. जिम आणि अमित यांनी त्यांच्या ‘पुणे हायवे’ या चित्रपटाबद्दलही मंचावर चर्चा केली. अमित म्हणाला की, गेल्या काही वर्षांत सिनेमात खूप बदल झाले आहेत. आम्हाला खूप काम करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला अभिमान आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला सिनेमा किंवा अभिनयाचे काहीच ज्ञान नव्हते. पण हे काम करावे लागेल हे मला माहीत होते. मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद आहे.

जिम सरभ यांनीही आपल्या कारकिर्दीबद्दल मनमोकळी चर्चा केली. तो म्हणाले की, जेव्हा आपण एखादी गोष्ट मोठ्या तीव्रतेने करतो तेव्हा आपल्याला त्या भूमिकेचा रनटाइम काय असतो हे कळत नाही. कोणत्याही चित्रपटात रोलचे रनटाइम असते. जे संपूर्ण चित्रपटाला आकार देतात. चित्रपटाची संपूर्ण टीम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.