सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? पहिल्या क्रमांकावर असलेले नाव खूपच आश्चर्यकारक
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याच्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. यानुसार, पाच मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. लोकांची मते जाणून घेऊन या नावांची निवड करण्यात आली आहे. यातील पहिले नाव हे खूपच आश्चर्यकारक मानले जात आहे.
नवी दिल्ली | 18 फेब्रुवारी 2024 : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे खूपच मनोरंजक निकाल समोर आले आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आहेत. या यादीतील पहिल्या क्रमांकावर असलेले नाव खूपच आश्चर्यकारक आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. लोकांची मते जाणून घेऊन हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशातील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आणि स्वीकारार्हतेचे मूल्यांकन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी मुख्यमंत्र्यांमधील लोकप्रियता रेटिंगबाबत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे.
सर्वेक्षणानुसार, डॉ. माणिक साहा हे 41.4 टक्के रेटिंगसह लोकप्रियतेच्या पाचव्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. त्यांना 42.6 टक्के रेटिंग मिळाले आहे. याच यादीत 48.6 टक्के रेटिंग मिळवून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 51.3 टक्के रेटिंगसह लोकप्रियतेच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 52.7 टक्के अभूतपूर्व लोकप्रियता रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आले आहेत.
ओडिशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम नवीन पटनायक यांच्या नावावर आहे. त्यांचे वडील बिजू पटनायक हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री होते. नवीन पटनायक यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर 1997 मध्ये राजकारणात प्रवेश केला. एक वर्षानंतर त्यांनी वडील बिजू पटनायक यांच्या नावावर बिजू जनता दलाची स्थापना केली. बिजू जनता दलाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले.
बिजू जनता दल आणि भाजप सरकारमध्ये नवीन पटनायक मुख्यमंत्री झाले. त्यांनी ‘भ्रष्टाचार विरोधात लढा’ आणि ‘गरीब समर्थक धोरणे’ सुरू केली. नोकरशाहीचे योग्य व्यवस्थापन करून राज्याचा विकास करण्याचे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. ते त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणले. ओडिशात त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. जनतेनेही त्यांना पूर्ण पाठबळ देऊन सलग चार वेळा मुख्यमंत्री बनविले. नवीन पटनाईक हे एक लेखक देखील आहेत.