कोण आहेत सर्वात बुजुर्ग वकील पी. बालासुब्रमण्यन, 98 व्या वयातही करतायेत वकीली
बार एण्ड बेंचच्या वृत्तानूसार पी. बालासुब्रमण्यन मेनन यांचे नाव अलिकडेच जगातील सर्वात अधिक काळ सेवा देणारा वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव नोंदले गेले आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे त्यांचे वय 98 आहे. त्यांनी वकीलीच्या पेशात 73 वर्षे आणि 60 दिवस पूर्ण केले आहेत.
नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : ज्या वयात नातवाला खेळत बसायचं असतं, त्या वयात पी. बालासुब्रमण्यन मेनन कोर्टात काळा कोट चढवून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद करतात. मेनन यांचे वय 98 झाले असून त्यांचे नाव निनीज बुकात नोंदले गेले आहे. अजूनही त्यांचा निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. जेव्हा त्यांना निवृत्तीबद्दल विचारलं जाते तेव्हा ते म्हणतात जेवढे होऊ शकेल तेवढे काम करणार आहे. मी 98 वर्षांचा आहे. मी अजून निवृत्तीबद्दल विचार केलेला नाही. आताही मी काम करणार आणि स्वत:ची उपजिवीका भागविणार आहे.
बार एण्ड बेंचच्या वृत्तानूसार पी. बालासुब्रमण्यन मेनन यांचे नाव अलिकडेच जगातील सर्वात अधिक काळ सेवा देणारा वकील म्हणून गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव नोंदले गेले आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे त्यांचे वय 98 आहे. त्यांनी वकीलीच्या पेशात 73 वर्षे आणि 60 दिवस पूर्ण केले आहेत. यामुळे त्यांनी जिब्राल्टर सरकारचे वकील लुईस ट्रायचा 70 वर्षे आणि 311 दिवसांचा वकीली करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे.
वकीली पेशा पहिली पसंत नव्हती
बार एण्ड बेंचशी बोलताना पी. बालासुब्रमण्यन मेनन यांनी म्हटले आहे आपण स्वप्नातही विचार केला नाही की आपले नाव गिनिज बुकात नोंद होईल. मेनन यांनी वकीली करियरची सुरुवात साल 1950 मध्ये केली होती आणि साल 1952 मध्ये सिव्हील लॉमध्ये त्यांनी प्रक्टीस सुरु केली. मेनन यांनी जरी वकीलीमध्ये आपले 73 वर्षांचे करीयर केले असले तरी त्यांची वकीली ही त्यांची पहीली पसंती नव्हती. आपल्या भावा-बहिणींसोबत इंजिनिअरिंग आणि मेडीकलचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या आई-वडीलांनी त्यांनी कायद्यात करीयर करावे असे स्वप्न पाहीले. आणि त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश केला.
टर्निंग पॉइंट ठरला
मेनन यांनी सुरुवातीला मद्रास हायकोर्टात एडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ताच्या ज्युनिअर म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर आई-वडीलांच्या इच्छेमुळे ते पलक्कडमध्ये आले. कायद्यात रस नसतानाही त्यांनी मुख्य रुपात गुन्हेगारी खटल्यात वकीलीचे काम पाहीले. फोर्ट कोच्चि येथील एका प्रकरणात खंडपीठ त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांना सिव्हील कायद्यात तज्ज्ञ होण्यास सांगितले. मेनन या घटनेला आपला टर्निंग पॉइंट मानतात.