शिवराज सिंह चौहान यांच्या ‘लाडली’ ने केला चमत्कार, काँग्रेसचा अवघा खेळच पालटवला

Assembly Election 2023 | शिवराज सिंह चौहान यांना मोठा फटका बसणार, त्यांच्यावर नाराजी असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज होता. पण आता एक 'लाडली' गेमचेंजर ठरल्याचा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. या लाडलीमुळेच त्यांनी काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केले. मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत 34 विधानसभा मतदारसंघात महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केल्याचे समोर येत आहे. त्यातच चौहान यांच्या विजयाचे गणित पक्के झाले.

शिवराज सिंह चौहान यांच्या 'लाडली' ने केला चमत्कार, काँग्रेसचा अवघा खेळच पालटवला
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 3:40 PM

भोपाळ | 3 डिसेंबर 2023 : अगदी तीन दिवसांपू्र्वीच्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी भाजपच्या हातून मध्यप्रदेश जात असल्याचे भाकित केले. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. ही कांटे की टक्कर असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी भाजप मध्यप्रदेशात सत्तास्थानी आली. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, टायगर अभी जिंदा है. राजकीय विश्लेषकांनी त्यावेळी पण चौहान यांच्याविरोधात भाष्य केले होते. पण जनमानसात चौहान हे ‘मामा’ म्हणून लोकप्रिय आहे. त्यांनी दोन वर्षांपासूनच विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम केली. ते खेड्यापाड्यात पोहचले. लोकांमध्ये रमले. त्यांच्या लाडली बहन या योजनेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले. मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत 34 विधानसभा मतदारसंघात महिलांनी पुरुषांहून अधिक मतदान केले. ही योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरली.

योजनेवर ठेवली बारीक नजर

मध्यप्रदेशात भाजप सत्तेत कमबॅक करत आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. या विजयात लाडली बहन योजनेचा सिंहाचा हात आहे. या योजनेतंर्गत शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील जवळपास 1 कोटी 31 लाख महिलांची खाती उघडली. या खात्यात दोन हप्त्यात 1250 रुपये जमा करण्यात आले. या राजकीय खेळीचा भाजपला मोठा लाभ झाला. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला. ही योजना तारणहार ठरली.

हे सुद्धा वाचा

मतपेटीतून दिसला परिणाम

ह योजना गुरुकिल्ली ठरली. मतपेटीतून या योजनेने परिणाम दाखवला. शिवराज सिंह यांच्या प्रयत्नाला यश आले. ही योजना खिसा आणि हृदयात पोहचली. त्याचा थेट परिणाम दिसला. मध्यप्रदेशातील 34 मतदारसंघात महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केले. हे मतदान कोणाला मिळाले हे आकडेवारीवरुन समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार संभामध्ये या योजनेवर भर दिला. मनोवैज्ञानिक प्रभाव दिसला. ही भावनिक साद उपयोगी पडली.

पंतप्रधानांनी मध्यप्रदेश पिंजून काढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशावर खास लक्ष दिले. त्यांनी या प्रदेशात एकूण 14 सभा घेतल्या. त्याचा मोठा परिणाम दिसून आला. त्यात शिवराज सिंह यांच्या लाडली बहन योजनेने कळस चढवला. शिवराज सिंह यांनी त्यांच्या कामवर मतदानाचे आवाहन केले. भाजपने खूर्ची वाचवली खरी पण आता या खूर्चीवर कोण बसणार हे अजून स्पष्ट नाही. शिवराज सिंह हेच पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल की नवीन चेहरा मिळेल हे लवकरच समोर येईल.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.