कोण होता तो क्रूर इंग्रज अधिकारी? त्याच्याबाबत पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
1857 चा उठाव दडपण्यात या अधिकाऱ्याची मोठी भूमिका होती. अतिशय क्रूर आणि कपटी अशी या अधिकाऱ्याची ओळख होती. त्याने भारतीयांचा प्रचंड छळ केला.
केंद्र सरकारने मंगळवारी ईस्ट इंडिया कंपनीचा एक इंग्रज अधिकारी जॉन निकोलस याच्या प्रतिमेवरील राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचा दर्जा हटवला आहे.या निर्णयाकडे केंद्र सरकारनं उचलेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. 1857 चा उठाव दडपण्यात या अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका होती.जॉन निकोलस याने त्याच्या कार्यकाळात भारतीयांवर अन्वित अत्याचार केले. तो भारतीयांचा द्वेष करत होता.1857 च्या उठावादरम्यान दिल्लीला वेढा टाकण्यात तो सर्वात आघाडीवर होता.
जॉन निकोलस याची ही प्रतिमा दिल्लीतल्या काश्मिरी गेट परिसरामध्ये होती. तो याच परिसरामध्ये एका चकमकीमध्ये मारला गेला होता.सध्या स्थितीमध्ये जॉन निकोलस याची प्रतिमा त्या स्थानावर नाहीये. त्याची प्रतिमा 1958 सालीच आयरलँडला पाठवून देण्यात आली होती. आता त्या जागी त्याची आठवण म्हणून एक पट्टिका आणि आधारशिला आहे. मात्र तरी देखील या अधिकाऱ्याच्या प्रतिमेला राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचा दर्जा देण्यात आला होता. हा दर्जा आता काढून टाकण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.
1913 मध्ये काश्मिरी गेट परिसरात उभारण्यात आले होते स्मारक
1913 मध्ये जॉन निकोलस याची ही प्रतिमा दिल्लीतल्या काश्मिरी गेट परिसरामध्ये उभारण्यात आली होती. एका चकमकीदरम्यान या परिसरामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.1958 साली त्याची ही प्रतिमा आयरलँडला पाठवून देण्यात आली होती. मात्र तरी देखील तिथे त्याचं स्मारक होतं. या स्मारकला राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचा दर्जा देण्यात आला होता. तब्बल 111 वर्षांनंतर केंद्र सरकारने हा दर्जा रद्द केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे.
कोण होता जॉन निकोलस?
जॉन निकोलस हा ईस्ट इंडिया कंपनीचा एक सैन्य अधिकारी होती. तो आपल्या क्रूरपणासाठी ओळखला जाई. त्याने आपल्या कार्यकाळामध्ये भारतीयांचा प्रचंड छळ केला. 1857 चा उठाव दडपण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर तो एका चकमकीदरम्यान दिल्लीमध्ये मारला गेला. तो जिथे मारला गेला तिथे त्याचं स्मारक उभारण्यात आलं.