INDIA आघाडीची कमान कुणा हाती? लालू प्रसाद यादव यांनी दिला काँग्रसेला झटका, ममता बॅनर्जीसाठी अनेकांची वकिली

INDIA Aaghadi Mamata Banerjee Head : इंडिया आघाडीचा प्रमुख कोण असावा यावरून या आघाडीत धुमशान होण्याची शक्यता आहे. सर्वानुमते नेतृत्वाची निवड करण्याची आग्रही भूमिका ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा काँग्रेसला झटका दिला आहे. काय म्हणाले बिहारचे माजी मुख्यमंत्री?

INDIA आघाडीची कमान कुणा हाती? लालू प्रसाद यादव यांनी दिला काँग्रसेला झटका, ममता बॅनर्जीसाठी अनेकांची वकिली
ममता बॅनर्जी इंडिया आघाडी, लालू प्रसाद यादव
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 11:36 AM

INDAI Alliance च्या नेतृत्वावरुन काँग्रेस आणि इतर अशी रस्सीखेच दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली होती. तर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या भूमिकेने आता पुन्हा वादळ उठले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव इंडिया आघाडीचे प्रमुख म्हणून सुचवले आहे. काँग्रेसच्या विरोधाला काही अर्थ नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ममता बॅनर्जी यांचीच नेता म्हणून निवड व्हायला हवी, असे ते म्हणाले. तर आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत आपलाच पक्ष बाजी मारणार असल्याचा दावा त्यांनी केला.

तेजस्वी यादव सुद्धा अनुकूल

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व देण्याची वकिली केली होती. त्यांनी इंडिया आघाडीतील इतर ज्येष्ठांच्या नावासाठी सुद्धा अनुकूलता दाखवली होती. याविषयीचा कोणताही निर्णय हा बहुमताने घेण्याबाबत त्यांनी आग्रही भूमिका मांडली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत इंडिया आघाडीच्या निराशाजनक प्रदर्शनावर चिंता व्यक्त केली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आघाडीने एकदिलाने काम करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी त्यांनी दाखवली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळतानाच आपण इंडिया आघाडीचे नेतृत्व सहज करू शकतो, अस दावा त्यांनी केला. मीच इंडिया आघाडीची स्थापन केली होती. आता या आघाडीचे नेतृ्त्व करण्याची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. ते (काँग्रेस) इंडिया आघाडी व्यवस्थी चालवू शकत नाहीत तर ,त्याला मी काय करु शकते? मला वाटतं सर्वांना घेऊन जाणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

या सर्व घडामोडीवर काँग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया आली आहे. बिहार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल पुरत्याच मर्यादीत आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय नजर नाही. त्यांच्याकडे देशातील मुद्यांची व्याप्ती जाणण्या इतपत समज नसल्याचे ते म्हणाले. तर संजय राऊत यांनी याप्रकरणात कोलकत्ता येथे जाऊन ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणार असल्याचे सांगीतले.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.