67 पाकिस्तानींच्या सुरक्षेसाठी भारताचे 680 सशस्त्र जवान का आहेत तैनात, नेमकं कारण काय?
या यात्रेकरूंचं स्पेशल ट्रेनन भारतामध्ये आगमन झालं, भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाचा 813 वा वार्षिक उरूस सुरू आहे. या उरूसात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी यात्रेकरूंचा एक मोठा गट सोमवारी पहाटे 3.30 वाजता राजस्थानमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये एकूण 67 यात्रेकरूंचा समावेश आहे. या यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. 67 पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतातील 680 सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
हे यात्रेकरू स्पेशल ट्रेनने अजमेरला पोहोचले त्यानंतर त्यांना दोन बसमधून हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा येथे नेण्यात आलं. हे यात्रेकरू विशेष नमाजमध्ये सहभागी होणार आहेत.विभागीय वाणिज्य अधिकारी आणि यात्रा अधिकारी विवेकानंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे यात्रेकरू स्पेशल ट्रेननं अजमेरला पोहोचले. अजमेर रेल्वे स्थानकातून त्यांना दोन बसनं अजमेरच्या केंद्रीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयात नेण्यात आलं.तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. गेल्या वर्षी 232 यात्रेकरू या उरूसात सहभागी होण्यासाठी भरतामध्ये आले होते, मात्र यावेळी फक्त 67 यात्रेकरूच भारतामध्ये आले आहेत.
स्पेशल ट्रेननं भारतात आगमन
या यात्रेकरूंचं स्पेशल ट्रेनन भारतामध्ये आगमन झालं, भारत सरकार आणि राजस्थान सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 67 प्रवाशांसाठी तब्बल 680 सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत.पोलीस अधिकारी रामावतार यांनी सांगितलं की या यात्रेकरूंची रेल्वे स्थानकावरच सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना चोख पोलीस बंदोबस्तामध्ये दोन बसने अजमेरच्या केंद्रीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयात नेण्यात आलं.तिथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
भाविकांच्या संख्येत घट
दरम्यान गेल्या वेळी या उरूसासाठी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी यात्रेकरूंची सख्या तब्बल 232 इतकी होती, मात्र यावेळी त्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. यावेळी केवळ 67 यात्रेकरूच भारतामध्ये आले आहेत. मात्र भारत सरकारकडून त्यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनपासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.