बसच्या सीट निळ्या रंगाच्याच का असतात? कधी विचार केलाय का?

शेकडो बसेसच्या सीट पाहिल्यात तर तुम्हाला त्यातील बहुतांश बसमध्ये निळ्या रंगाच्या सीट दिसतील. तर काही बसमध्ये रंग निळा नसला तरी सीटवर एक आगळीवेगळी डिझाईन नक्कीच असते. जाणून घेऊयात नेमकं कारण

बसच्या सीट निळ्या रंगाच्याच का असतात? कधी विचार केलाय का?
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 5:26 PM

अनेकदा आपण ट्रेन, कारने प्रवास करत असतो त्यासोबतच अनेकांनी बसने एकदातरी प्रवास केला असेलच. कुठेही सहज पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक उत्तम पर्याय आहे. बरेच लोक हे रोजच्या प्रवासासाठी ट्रेन आणि बसचा पर्याय अवलंबतात. बहुतांश लोक जवळच्या अंतरासाठी बसचा वापर करतात. पण तुम्हाला बसशी संबंधित एक रंजक गोष्ट माहित आहे का? खरं तर, यात सरकारी बस असो वा खाजगी, तसेच स्कूल बस असो किंवा शहरांमध्ये धावणाऱ्या लो फ्लोअर बसेस असोत, तुम्हाला यात एक गोष्ट कॉमन दिसली असेल, ती म्हणजे या बसमधील सीटचे रंग. सहसा बहुतांश बसेसच्या सीट या निळ्या रंगाच्या असतात तर इतर काही बसेस मध्ये निळ्या रंगाच्या सीट ऐवजी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे कव्हर असतात. प्रत्येक बसची सीट निळ्या रंगाची असते किंवा त्यावर पॅटर्न असेल असे नाही पण अनेक बसमध्ये तुम्हाला निळ्या रंगाचे सीट आणि त्यावर वेगळ्या प्रकारचे डिझाईन दिसेल. तर यामागे एक खास कारण आहे, ज्याची माहिती अनेकांना नसते.

सरकारी बसेस किंवा इतर कोणत्याही बसेस तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला त्यातील बहुतांश बसमध्ये निळ्या रंगाच्या सीट दिसतील. कधी सीटचा रंग निळा नसला तरी त्यावर एक वेगळ्या प्रकारची डिझाईन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? नेमका का बरं बसच्या सीटचा रंग गडद का असतो ? लोकांना याबाबत फारशी माहिती नसली तरी ही बाब प्रवाशांच्या आरोग्याशीही निगडित असल्याने जाणून घेणे गरजेचे आहे.

बसच्या सीट गडद रंगाच्याच का असतात?

बहुतांश बसमध्ये निळ्या रंगाच्या सीटचा वापर जास्त करून केला जातो. जेणेकरून कोणतीही धूळ किंवा जंतू त्यावर दिसणार नाहीत. अनेकवेळा सीटवर खूप धूळ असते, जी दिसू लागते. कारण दररोज हजारो लोक बसने प्रवास करतात, अशा स्थितीत सीट खराब होणं स्वाभाविक आहे. जर बसच्या सीटचा रंग फिका असेल, तर त्यावर साचलेली घाण सहजपणे दिसून येईल. हे लक्षात घेऊन बसच्या सीटचा गडद रंग दिला जातो. म्हणून सीटचा रंग जितका गडद असेल आणि त्यावर पॅटर्न जास्त असतील तितके सीटवर धूळ बसत नाही. केवळ याच कारणास्तव सीटवर असे रंगीत कापड लावले जाते.किंवा गडद रंगाचे सीट लावले जातात.

सीटचा पॅटर्न

तसेच सीटवर लावण्यात आले कापडाचे कव्हर खूप जाड असते आणि त्यावरील आगळीवेगळी डिझाईन सुद्धा असते, कारण सीटवर असलेली धूळ कापड शोषून घेतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बसमध्ये दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे त्या सीटला लाकडाचा मारा केला तर इतकी धूळ येईल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे बसेसच्या सीट स्वच्छ दिसण्यासाठी त्यावर गडद रंगाचे कापडाचे कव्हर लावण्यात येतात.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.