भाजपला यंदा कोणामुळे बसला इतका मोठा झटका, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

| Updated on: Jun 07, 2024 | 11:52 PM

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. अनेक मोठे नेते पराभूत झालेत. काय आहे यामागचं कारण. कोणाची झाली चूक, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

भाजपला यंदा कोणामुळे बसला इतका मोठा झटका, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
Follow us on

प्रशांत किशोर यांनी आज लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेल्या पराभवाचे कारण सांगितले आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. बहुमताचा आकडा गाठता न आल्याने भाजपला एनडीएमधल्या घटकपक्षांसोबत सरकार स्थापन करावे लागणार आहे. पण भाजपला हा मोठा झटका का लागला, याला जबाबदार कोण, हे देखील प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास भाजपने कायम ठेवल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. भाजपचे 208 जुने खासदार विजयी झालेत. पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला आहे. पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी ठिकाणी अशी उमेदवारी दिल्याने त्यांचा पराभव झाला. भाजपला माहित होते आणि त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात कोणते उमेदवार पराभूत होत आहेत हे देखील समोर आले होते, परंतु त्यांनी काळजी न करता पंतप्रधान मोदींची सभा झाली तर विजय होईल असे सांगितले. अशा अनेक जागा आहेत जिथे भाजपने सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन तिकिटे दिली.

भाजपचे नुकसान होण्याचे कारण काय

निकालानंतर इंडिया टुडेशी बोलताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही भाजपचे नुकसान होण्याचे कारण देखील सांगितले. प्रशांत किशोर म्हणाले की,  “ अब की बार 400 पार यात काही चूक नव्हती, पण ती अर्धी घोषणा होती. त्यांना 400 का हवे आहे हे त्यांनी स्पष्ट सांगायला हवे होते. 2014 मध्ये म्हटले होते की, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. कारण तेव्हा त्यांना महागाई कमी करायची आहे. यावेळी तुम्ही 400 च्या पुढे म्हणालात. यामुळे काही लोकांना तो अहंकार वाटू लागला. तर काहींना हे षडयंत्र वाटले, ज्याचे भांडवल करून विरोधकांनी म्हटले की, संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० पार हवेत आहेत..

काय झाली मोठी चूक

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपचा 400 पासचा नारा ज्याने लिहिला. ही त्याची सर्वात मोठी चूक होती. याशिवाय भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना संविधान बदल्यासाठी ४०० जागा द्या असे म्हटल्याने ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, जे भाजप आणि पंतप्रधान मोदींना विरोध करत होते, त्यांचा एकच उद्देश होता. आम्हाला भाजपला कोणत्याही परिस्थितीत रोखायचे आहे. उदाहरणार्थ, वाराणसीच्या जागेवर, 2014 च्या तुलनेत पीएम मोदींच्या मतांची टक्केवारी केवळ दोन टक्क्यांनी कमी झाली, पण विरोधकांच्या मतांची टक्केवारी 20 टक्क्यांवरून 41 टक्क्यांपर्यंत वाढल्याने विजयाचे अंतर खूपच कमी झाले. जो हरतोय त्यालाच मत द्यायचं हे लोकांना माहीत होतं. वाराणसीमधून पीएम मोदींनी काँग्रेस आणि सपा इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींनी जवळपास 4 लाख 80 हजार मतांनी विजय मिळवला होता.