नारीशक्तीचे का मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार? काय दिली गॅरंटी
Assembly Election 2023 | दोन राज्यात काँग्रेसचे सुपडे का साफ झाले आणि भाजप का सत्तेत आले, या विजयाची किल्ली कोणाच्या हाती होती, याचे गुपीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघड केले. तीन राज्यातील विजयाचे शिल्पकार नारीशक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. मोदी यांनी नारीशक्तीचे गुणगान करण्यामागे कारण तरी काय आहे?
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल मॅच जिंकली. भाजपने मध्यप्रदेशाचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. एक्झिट पॉलला भाजपने वाकुल्या दाखवल्या. भाजपच्या सेवा भावमुळेच हा विजय खेचून आणता आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितले. तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांसी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी, मोदीच्या घोषणा देण्यात येत होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे सांगितले. पण या विजयाची खरी शिल्पकार नारीशक्ती असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. मोदी यांनी नारीशक्तीचे गुणगान केले. नारीशक्तीमुळेच हा विजय मिळवल्याचे ते म्हणाले. त्यांनी महिला विकासाची हमी पण भरली. ही हमीच एक गॅरंटी असल्याचे ते म्हणाले. अखेर महिला शक्तीने असा कोणता फायदा झाला? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
या चार जातींनी ठरवला रोडमॅप
आपल्यासाठी देशात चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंब या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथी याच वर्गातून येतात. आज मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वतः जिंकला आहे. प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो. जो २०४७ भारताला विकसित राष्ट्र पाहू इच्छितो, असे मत त्यांनी मांडले.
देशातील महिलाच भाजपला विजयी करणार
पंतप्रधान मोदी यांनी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन केले. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं मी सभेत सातत्याने सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं, असं त्यांनी अधोरेखित केले.
मध्यप्रदेशात दिसली चुणूक
मध्यप्रदेशात भाजप सत्तेत कमबॅक केले. या विजयात लाडली बहन योजनेचा महत्वाचा भाग होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या योजनेतंर्गत राज्यातील जवळपास 1 कोटी 31 लाख महिलांची खाती उघडली. या खात्यात दोन हप्त्यात 1250 रुपये जमा करण्यात आले. या राजकीय खेळीचा भाजपला मोठा लाभ झाला. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला. ही योजना तारणहार ठरली.