मिग 21 फायटर जेटला का होतात नेहमी अपघात ? ही आहेत कारणं

नवख्या वैमानिकालाही मिग - 21 विमान सहजतेने हाताळता येते. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उणीव असतानाही याचे निर्मितीमूल्य कमी असल्याने ते अजूनही वापरत आहे.

मिग 21 फायटर जेटला का होतात नेहमी अपघात ? ही आहेत कारणं
MIG 21Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 3:44 PM

मुंबई : राजस्थानच्या ( Rajasthan Plane Crashed ) हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी एका घरावर मिग – 21 फायटर ( Mig 21 crash ) जेट कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन गावकऱ्यांचा मृत्यू झाला. या विमानाचे पायलट आणि को – पायलटनी वेळीच पॅराशूटमधून ( Pilot Safe ) उडी मारल्याने त्यांचे प्राण बचावले. या पूर्वी अनेक वेळा मिग फायटर विमानांचा अपघात घडला आहे. त्यामुळे मिग मालीकेतल्या या विमानांचा वारंवार अपघात का होत आहे. याविषयी जाणून घेऊया

1 ) मिग सिरीजच्या जेट विमानाचा वेग प्रचंड मोठा आहे. मिग – 21 हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान आहे. जगभरातील 50 देशात आणि चार खंडात हे विमान वापरात आहे. हे विमान प्रती तास 2,500 किमी ( 46,250 फुट प्रति मिनिट ) इतक्या वेगात हवेत झेप घेते. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ – 16 विमानाच्या तोडीचा आहे. लॅंडींग वेळी त्याचा वेग 350 प्रति तास असतो. तो खूपच जादा आहे. इतका वेग काही वेळा धोकादायक ठरतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

2 )  मिग – 21 या विमानाचा वैमानिक जेथे बसतात तो कॅनोपी भाग लहान आहे. त्यामुळे या विमानाच्या पुढील भागातून आत ओढली जाते. त्यामुळे यात रडार ठेवण्याची जागा उरत नाही. या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा उपयोगात आला नाही. त्यामुळे वैमानिकाला रनवे दिसत नाही. तसेच वेगामुळेही अपघात होतात.

3 ) हे विमान खूपच जुने आहे. मिग सिरीजच्या विमानांची वयोमान खूप जास्त आहे. 1963 मध्ये मिग सिरीजच्या पहिले विमान भारताला मिळाले होते. अनेक दशके ते सेवा बजावत आहे. परंतू पायलटच्या प्रशिक्षणासाठी हे विमान सोपे असल्याने वापरात आहे. अनेक दशकानंतरही अनेक विमाने आपली सेवा देत आहेत.

4 )  या विमानाचा निर्माता असलेला देश रशिया देखील 1990 पासून याची निर्मिती करीत नसल्याने याचे आपल्याला इस्रायल किंवा अन्य देशातून याचे स्पेअर पार्ट आणावे लागत आहेत. दुसऱ्या कंपनीचे पार्ट्स वापराल्याने देखील अपघाताची शक्यता वाढली आहे.

5 ) मिग – 21 विमानाला सिंगल इंजिन असल्याने उड्डाणावेळी एक इंजिन खराब झाले तर मदतीला दुसरे इंजिन नसते. त्यामुळे अशावेळी पॅराशूटमधून उडी मारण्याशिवाय पर्याय नसतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.