तृतीयपंथी लोकं टाळ्या का वाजवतात? काय आहे नेमकं कनेक्शन
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा तुम्ही ज्या परिसरामध्ये राहात असाल त्या ठिकाणी तुम्हाला कधीकधी तृतीयपंथी लोक दिसून येतात. तृतीयपंथी लोकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे ते बोलताना अनेकदा टाळ्या वाजवतात.
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा तुम्ही ज्या परिसरामध्ये राहात असाल त्या ठिकाणी तुम्हाला कधीकधी तृतीयपंथी लोक दिसून येतात. तृतीयपंथी लोकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे ते बोलताना अनेकदा टाळ्या वाजवतात. तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना अनेकदा तृतीयपंथी लोक दिसतता, जे तुमच्याकडे पैशांची मागणी करतात, पैसे मागताना देखील ते टाळ्या वाजवतात. तुम्ही पैसे दिले नाही तरी टाळ्या वाजवतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की तृतीयपंथी लोक टाळ्या का वाजवतात, त्यामागे एक खास कारण आहे, आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
तृतीयपंथी टाळ्या का वाजवतात?
तृतीयपंथी लोक एका खास विशिष्ट लईमध्ये टाळ्या वाजवतात, तो टाळीचा आवाज आला की आपल्याला तृतीयपंथी व्यक्ती आल्याची जाणीव होते. तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल, एखादं मंगल कार्य असेल तर अशावेळी हे तृतीयपंथी लोक या कार्यक्रमात पोहोचून वधू वराला टाळ्या वाजून शुभेच्छा देतात. ते विशिष्ट पद्धतीने टाळ्या वाजवतात, सामान्य माणसानं वाजवलेली टाळी आणि तृतीयपंथी व्यक्तीनं वाजवलेली टाळी यात फरक असतो. तृतीयपंथी लोक कधीच विनाकारण टाळी वाजवत नाहीत, टाळी वाजवण्याच्या त्यांच्या विशिष्ट पद्धतीमुळे एका तृतीयपंथी व्यक्तीला दुसरा तृतीयपंथी व्यक्ती सहज ओळखता येते.
अनेकदा काहीजण तृतीयपंथ्यांसारखी वेशभूषा धारण करून त्यांच्यासारख्या टाळ्या वाजवून लोकांकडे पैसे मागण्याचा प्रयत्न करतात. मात्र या व्यक्तीची टाळ्या वाजवण्याची पद्धत आणि टोन हा वेगळा असतो. त्यामुळे तृतीयपंथी अशा लोकांना सहज ओळखतात की हा तृतीयपंथी नसून एक महिला किंवा पुरुष आहे. तृतीयपंथी लोक हे त्यांची ओळख दाखवण्यासाठी तसेच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी टाळ्यांना आपलं माध्यम बनवतात, त्यामुळे ते सतत टाळ्या वाजवत असतात. या टाळ्यांमुळेच त्यांची दखल देखील घेतली जाते.
तृतीयपंथी लोकांनी वाजवलेल्या टाळ्या शुभ की अशुभ
तुमच्या घरात एखादा लग्न असेल, शुभकार्य असेल कोणाचा वाढदिवस असेल तर अशावेळी तिथे उपस्थित राहून हे तृतीयपंथी लोक टाळ्या वाजवून त्या व्यक्तीला शुभेच्छा देतात. अशा कार्यात तृतीयपंथीयांनी वाजवलेल्या टाळीला शुभ मानलं जातं. तसेच जर दोन तृतीयपंथी व्यक्तींमध्ये भांडण झाली तर तेव्हा देखील ते टाळ्या वाजवतात, त्यावेळी हे लोक आपली भावना व्यक्त करत असतात.