भल्या -भल्या शत्रूंना घाम फोडणारे कमांडो अंडरविअर का घालत नाहीत? या युद्धाशी आहे खास कनेक्शन

सैन्यामध्ये कंमाडो असतात, कंमाडो म्हणजे सैन्य दलातील असे अधिकारी असतात की त्यांना इतरांपेक्षा खास आणि अत्यंत कठीण असं प्रशिक्षण दिलं गेलेलं असंत.

भल्या -भल्या शत्रूंना घाम फोडणारे कमांडो अंडरविअर का घालत नाहीत? या युद्धाशी आहे खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 9:01 PM

आज अनेक देश आपल्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी मोठा वाटा हा आपल्या देशाच्या सैन्यदलावर खर्च करतात. ज्या देशाचं सैन्यबळ अधिक तो देश सर्वात शक्तिशाली मानला जातो. हे आजच नाही तर अगदी रामायण, महाभारत काळापासून सुरू आहे. प्राचीन काळात सुद्धा ज्या राज्याकडे अधिक सैन्यबळ असेल त्या राज्याकडे नजर वाकडी करून पाहाण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती. त्यामुळे आजच्या काळात देखील आपली सैन्य शक्ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न आणि स्पर्धा ही जगातील सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. सैन्यामध्ये अनेक प्रकार असतात. साधारणपणे नौदल, वायूदल आणि मिलेट्री असे तीन प्रमुख प्रकारात सैन्याचं वर्गीकरण करण्यात येतं.

सैन्यामध्ये कंमाडो असतात, कंमाडो म्हणजे सैन्य दलातील असे अधिकारी असतात की त्यांना इतरांपेक्षा खास आणि अत्यंत कठीण असं प्रशिक्षण दिलं गेलेलं असंत. कितीही कठीण आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्येही शत्रूंच्या सैन्याचा खात्मा करण्यात हे कमांडो सक्षम असतात. आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊ की कमांडो अंडरविअर का घालत नाहीत. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का, मात्र याचं उत्तर आपल्याला एका युद्धामध्ये सापडतं.

प्रत्येक देशाकडे कमांडोची एक स्पेशल तुकडी असते, या तुकडीला प्रत्येक देशात वेगवेगळी नावं दिली जातात. मात्र जेव्हा स्पेशल ऑपरेशन सुरू असतं तेव्हा हे कमांडो अंडरविअर घातल नाहीत.याचं उत्तर आपल्याला 1970 च्या युद्धामध्ये सापडतं हे युद्ध अमेरिका आणि व्हिएतनाममध्ये झालं होतं. अमेरिकेच्या सैन्यांनी व्हिएतनामवर आक्रमक केलं. मात्र व्हिएतनामचं सैन्य देखील अतिशय चिवट होतं. हे युद्ध अनेक दिवस चाललं मात्र येथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण हे अमेरिकेच्या सैन्याला सहन होत नव्हतं. व्हिएतनामचं जंगल तेथील उष्ण वातावरण आणि भौगोलिक परिस्थिमुळे अमेरिकेला एकाचवेळी दोन शत्रूंशी लढण्याची वेळ आली एक म्हणजे व्हिएतनामचे सैन्य आणि दुसरं म्हणजे या सर्व वातावरणामुळे अमेरिकेच्या सैन्यांना मोठ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शन झालं, हे इन्फेक्शन ताईट अंडरविअर मुळे झाल्याचं लक्षात आल्यानंतर सैन्यानं अंडरविअर न घालण्याचे आदेश निघाले.

दुसरीकडे ब्रिटनच्या रॉयल मरीन कमांडोजने 1982 मध्ये फॉकलँड्सवर हल्ला केला. मात्र जे मिळेल ते खायचं आणि युद्ध सुरू ठेवायचं अशी वेळ त्यांच्यावर आली, त्यामुळे तिथे डायरियाची साथ पसरली. त्यांना वारंवार आपली पँट उतरावी लागे त्यामुळे त्यांनी अंडरविअर घालणं सोडून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीही असाच एक प्रसंग आला. त्यामुळे आता ही प्रथाच पडली आहे. कंमाडो आपली अंडरविअर आपल्या सोबत ठेवतात मात्र स्पेशल ऑपरेशनच्या वेळी अंडरविअर न घालण्याचा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जातो.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.