उत्तर भारतात मुसळधार पाऊस का पडतोय? हवामान खात्याने दिले उत्तर
Rain in North India : देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तिथले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस (Rain in North India) सुरु आहे. हवामान खात्याने सांगितलं की, वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सूनच्या वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस झाला आहे. त्याबरोबर भारतीय हवामान खात्याने (IMD) जुलै महिन्या आगोदर पाऊस व्हायला हवा होता. पण सध्याचा पाऊस (RAIN UPDATE) मागच्या महिन्याची कसर भरून काढत आहे असंही ते म्हणाले आहेत.
हवामान खात्याचे सीनियर वैज्ञानिक डॉ सोमा सेनरॉय यांनी एका खासगी वाहिनीला सांगितलं की, मान्सून देशातील अनेक राज्यात चांगलाचं सक्रीय झाला आहे. त्याचबरोबर राजस्थान राज्यात एक्यूप्रेशर तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील ओलावा उत्तर पश्चिम भारतात पोहचत आहे. मान्सून आणि वेस्टर्न ट्रफमुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक 35 सेमी, हिमाचल प्रदेशात 23 सेमी, उत्तराखंडमध्ये 16 सेमी आणि हरियाणामध्ये 24 सेमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. तिथल्या परिस्थितीचे व्हिडीओ सोशस मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे आज हिमाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या सुध्दा काही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उद्या सुध्दा हिमाचल प्रदेशात येलो अलर्ट असेल. विशेष म्हणजे काल सुद्धा उत्तराखंडच्या काही भागात अधिक पाऊस झाला आहे.
यंदाचा पाऊस 243.2 मिमी पर्यंत गेला आहे. सामान्य 239.1 मिमी पेक्षा दोन टक्के अधिक आहे. उत्तर भारतात अतिवृष्टी झाल्यामुळे दिल्लीतील काही नद्यांना चांगलाचं पूर आला आहे. काही भूस्खलन सुद्धा झालं आहे. दिल्लीत काही घरात पाणी घुसलं आहे, तर काही ठिकाणी कार वाहून गेल्या आहेत.
पुढच्या काही दिवसात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-कश्मीर, राजस्थान, दिल्ली आणि काही परिसरात अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हिमाचल प्रदेशात मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या पावसामुळं भूस्खलन झालं आहे. हिमाचलमध्ये 14 ठिकाणी भूस्खलन झालं आहे. उत्तराखंडमध्ये 9 ठिकाणी भूस्खलन झालं आहे. दिल्लीत वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाच लोकांचा मृत्यू होईल.