Tauktae : वादळाचे नाव आठ अक्षरीच का ठेवले जाते? जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

चक्रीवादळांना नावे देण्याचा जसा नियम आहे तसाच त्यांची नावे हटवण्याचाही नियम आहे. जेव्हा चक्रीवादळ हिंद महासागराच्या भोवती फिरत असते तेव्हा त्याला एक विशेष नाव दिले जाते. त्याचा विशेष नियम आहे. (Why is the name of the storm only eight letters, know all about it)

Tauktae : वादळाचे नाव आठ अक्षरीच का ठेवले जाते? जाणून घ्या याबाबत सर्व माहिती
गेल्या दोन वर्षात अनेक चक्रीवादळांचा सामना केल्यानंतर आता भारताला पुन्हा एकदा जवाद चक्रीवादळाचा धोका आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येणाऱ्या चक्रीवादळांमुळे दरवर्षी भारतात शेकडो लोकांचा मृत्यू होतो.
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 4:32 PM

नवी दिल्ली : गेले दोन दिवस गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये तौक्ते वादळाने हाहाःकार माजवला आहे. याआधीही निवार (Nivar), अनफान, फणी, फुलपाखरू, बुलबुल, गाझा अशी वादळांनी जनजीवन विस्कळीत करुन टाकले होते. अनेक संकार उघड्यावर आणले. अनेक जीवितहानी केली. मात्र आपण कधी विचार केला आहे का चक्रीवादळाचे नाव आठ अक्षरीच असते. का असते आठ अक्षरीच नाव? जेव्हा चक्रीवादळ हिंद महासागराच्या भोवती फिरत असते तेव्हा त्याला एक विशेष नाव दिले जाते. त्याचा विशेष नियम आहे. (Why is the name of the storm only eight letters, know all about it)

चक्रीवादळांना नावे देण्याचा जसा नियम आहे तसाच त्यांची नावे हटवण्याचाही नियम आहे. मंगळवारी गुजरातच्या किनारपट्टीवर जे आदळणाऱ्या चक्रीवादळाचे नाव शेजारील देश म्यानमारच्या म्हणण्यानुसार ठेवले गेले आहे. इंग्रजीमध्ये त्याचे नाव Tauktae आहे, ज्याचा भारतीय उच्चार तौक्ते आहे. हे कर्कश आवाज करणाऱ्या पालीचे नाव आहे. या पालीच्या नावावरुन तौक्ते वादळाला नाव देण्यात आले आहे.

कसे दिले जाते वादळाला नाव

भारतात हाहाःकार माजवणाऱ्या या वादळाला बर्मा किंवा इराणच्या हवामान शास्त्रज्ञांनी नाव का ठेवले? उत्तर सोपे आहे. महासागरातील कोणत्या भागात वादळ निर्माण होते यावर वादळाचे नाव अवलंबून आहे. म्हणजेच ओरिजिनेटिंग साईटवर याची दखल घेतली जाते, जेथे धडकणार त्यावरुन नाही. इराण आणि बर्माच्या सागरी भागात तौक्ते तयार झाले आहे, म्हणूनच याचे नाव म्यानमारवर आधारीत देण्यात आले आहे.

या देशांचा नामकरणात आहे समावेश

जगभरात 6 क्षेत्रीय विशेष हवामान केंद्रे (RSMC) आणि 5 क्षेत्रीय उष्णकटिबंधीय चक्रवात चेतावणी केंद्रे (TCWC) चक्रीवादळांची नावे ठरवतात. RSMC चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. यामध्ये हिंद महासागर बेसिनच्या देशांचा समावेश आहे, ज्यात बांग्लादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन यांचा समावेश आहे. या देशांनुसार हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या वादळांची नावे ठरविले जातात. त्याचप्रमाणे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची नावे नवी दिल्लीने ठरवली जातात. नामकरणात इतर सदस्य देशांच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात.

नाव देताना या गोष्टीची घेतली जाते काळजी

नवी दिल्लीमध्ये चक्रीवादळाचे नाव दिले जाते तेव्हा इतर देशांकडूनही सल्ला मिळतो. त्या सूचनांच्या आधारे नावात बदल किंवा सुधारणा केली जाऊ शकते. चक्रीवादळाला नाव देताना यामध्ये राजकीय आणि सांस्कृतिक विवाद होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. तसेच वादळांची नावे कधीही अपमानास्पद किंवा क्रूर असू नये. ती छोटी असावीत जेणेकरून ते उच्चारणे सोपे होईल. RCMC किंवा TCWC चा नियम आहे की वादळाचे नाव कधीही 8 अक्षरांपेक्षा जास्त नसावे.

कमाल 8 अक्षरांचे नाव

हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही वादळाचे नाव 8 अक्षरांपेक्षा जास्त मोठे नसते. जसे tauktae मध्ये 7 अक्षरे, nivar मध्ये 5 अक्षरे, अंफान amphan मध्ये 6 अक्षरे, फणी fani मध्ये 5 अक्षरे, तितली titli मध्ये 5 अक्षरे, बुलबुल bulbul मध्ये 6 अक्षरे, गाजा gaja मध्ये 4 अक्षरे आहेत. जागतिक हवामान संस्था (WMO) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सन 2004 मध्ये वादळाची 64 नावे सुचविण्यात आली होती जी वेगवेगळ्या देशांनी दिली होती. गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळ अंफानचे नाव त्याच यादीतून घेण्यात आले होते आणि त्या यादीतले हे शेवटचे नाव होते.

जुनी नावे कशी निवृत्त होतात?

डब्ल्यूएमओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चक्रीवादळ जर प्राणघातक ठरले असेल आणि त्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असेल तर ते नाव काढून टाकले जाते. वादळाचे ते नाव काढून टाकले जाते. हे नाव पुढे लगातार ठेवले जात नाही किंवा हे नाव पुढच्या वादळाला दिले जात नाही. जर आपण डब्ल्यूएमओचे रेकॉर्ड्स पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल. जसे मॅगहट (फिलिपिन्स, 2018), इरमा आणि मारिया (कॅरिबिया, 2017), हैयान (फिलिपिन्स, 2013), सॅंडी (अमेरिका, 2012), कॅटरिना (अमेरिका, 2005), मिच (होंडुरास, 1998) आणि ट्रेसी (डार्विन, 1974) ही नावे काढून टाकण्यात आली, कारण त्यांच्यामुळे संपूर्ण जनजीवनाचा विनाश केला. (Why is the name of the storm only eight letters, know all about it)

इतर बातम्या

7th Pay Commission: कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना धक्का, मे महिन्यात DA मध्ये वाढ नाहीच

‘रामभक्त कधी खोटं बोलत नाही’, कोरोना रिपोर्ट विचारणाऱ्यांना कंगनाचे बेधडक उत्तर!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.