रेल्वेच्या दोन पटरी जोडताना गॅप का ठेवला जातो? जाणून घ्या काय आहे कारण

आपण सर्वच जण रेल्वेतून दररोज किंवा कधी ना कधी प्रवास करतोच. मात्र आपल्याला रेल्वेविषयीच्या सर्वच गोष्टी ठाऊक असतात असे नाही. (Why is there a gap between the two tracks, Know what the reason is)

रेल्वेच्या दोन पटरी जोडताना गॅप का ठेवला जातो? जाणून घ्या काय आहे कारण
रेल्वेच्या दोन पटरी जोडताना गॅप का ठेवला जातो?
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:06 AM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वे मार्गावर दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. देशातील विविध भागात अर्थात विविध राज्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावल्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी होत आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर भारतीय रेल्वे पुन्हा एकदा आपल्या रंगात दिसून येईल आणि लाखो प्रवाशांना दररोज त्यांच्या गंतव्यस्थानी घेऊन जाईल, यात शंका नाही. आपण सर्वच जण रेल्वेतून दररोज किंवा कधी ना कधी प्रवास करतोच. मात्र आपल्याला रेल्वेविषयीच्या सर्वच गोष्टी ठाऊक असतात असे नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात, मात्र त्यामागील कारणे, रहस्ये आपल्याला ठाऊक नसतात. रेल्वे रुळाच्या पटरी जोडतानाही त्यात गॅप का ठेवला जातो, हा प्रश्नही अनेकांना पडलेला असतो. मात्र त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसते. (Why is there a gap between the two tracks, Know what the reason is)

पटरी जोडताना गॅप ठेवला जातो

भारतीय रेल्वे संपूर्ण वैज्ञानिक आणि तांत्रिक आधारावर धावते. परंतु, यात कामगार दलाचेही मोठे योगदान आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास केला आहे की नाही. भले तुम्ही ट्रेनने प्रवास केला नसेलही, तरी ट्रेनचे रुळ मात्र नक्कीच पाहिले असतील. जर आपण रेल्वे ट्रॅक पाहिले असतील तर आपण हेदेखील नक्कीच पाहिले असेल की थोड्या अंतरावर फिश प्लेट्सच्या मदतीने ट्रॅक जोडलेले असतात. जिथे जिथे ट्रॅक जोडलेले आहेत तेथे दोन पटरींमध्ये एक अंतर दिसते. आता बऱ्याच लोकांना असे वाटते की यामुळे मोठा रेल्वे अपघात होऊ शकतो. सर्वप्रथम आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, दोन पटरींमधील अंतराने आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा रेल्वे अपघात झालेला नाही.

पटरींमधील अंतर सोडण्यामागील नेमके कारण काय?

दोन पटरींदरम्यान विशिष्ट अंतर अर्थात गॅप सोडण्यामागे शास्त्रीय कारण आहे. वास्तविक, तीव्र उन्हाळ्यात अवजड रेल्वे गाड्यांच्या वजनाखाली लोखंडी पटरी वितळण्यास सुरवात होते. हिवाळ्यात ती पटरी संकुचित होते. लोखंडाचा हा सामान्य गुणधर्म आहे. लोखंडाच्या सामान्य गुणधर्मामुळे पटरी जोडताना एक छोटे अंतर सोडले जाते, जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात जेव्हा दोन पटरी ट्रेनच्या वजनाने पसरल्या जातात, तेव्हा त्यांना पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकते. जर पटरी पसरण्यासाठी जागा मिळाली नाही तर पटरींना तडा जाण्याची भिती असते. आता पटरींमधील अंतर कमी केले जात आहे. मात्र अंतर न ठेवण्याची चूक भारतीय रेल्वेने केलेले नाही. (Why is there a gap between the two tracks, Know what the reason is)

इतर बातम्या

लस खरेदीच्या जागतिक निविदेसाठी केंद्राने एकसमान धोरण मसुदा जाहीर करावा : राहुल शेवाळे

Video: मुंबईला वादळ झोडपत होतं त्यावेळेस दीपिकासिंह काय करत होती? पावसात आग लावणारा Video

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.