Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Military recruitment : सैन्य भरतीबाबत का होतोय एवढा गदारोळ? भरती थांबवायला आणि ओव्हरएजचे संपूर्ण प्रकरण काय आहे?

लष्करातील भरती रखडल्याने देशभरात युवकांच्या संताचा उद्रेक होत आहे. बिहारमधील दरभंगामध्ये रविवारी उमेदवारांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी जाळपोळ करून निदर्शने केली.

Military recruitment : सैन्य भरतीबाबत का होतोय एवढा गदारोळ? भरती थांबवायला आणि ओव्हरएजचे संपूर्ण प्रकरण काय आहे?
सैन्य भरतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:38 PM

Military recruitment : हरियाणातील (Haryana) भिवानी येथील तालू गावात राहणाऱ्या 23 वर्षीय पवन पंघालने दोन आठवड्यांपूर्वी आत्महत्या केली होती. सैन्यात भरती (Army Recruitment) होण्यासाठी तो तयारी करत होता. मेडिकलपासून ते फिटनेसपर्यंतच्या सर्व चाचण्या त्याने पार पाडल्या होत्या. तर तो त्यात उत्तीर्ण ही झाला होता. मात्र कोरोना (Corona) महामारीमुळे सैन्य भरती थांबविण्यात आली त्यात त्याची वयोमर्यादा संपली. तो ओव्हरएज झाला होता. पवन वयाच्या १५ व्या वर्षापासून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत होता. पवन हा घराजवळ असणाऱ्या शाळेतील मैदानावर धावत असे. सैन्यात भरती होण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते. पण दोन वर्षे रखडलेल्या भरतीमुळे तो ओव्हरएज झाला. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न भंगले तेव्हा त्यांची जगण्याची आशाही थांबली. आणि त्याने गळफास घेतला. पवन ज्या शाळेच्या मैदानावर पळायचा त्याच शाळेच्या एका झाडावर त्याने गळफास घेत आपले जीवन संपवले.

लाखो तरुण सैन्यात भरती होण्याच्या प्रतीक्षेत

पवनने तर आत्महत्याचा मार्ग धरत आपली आशा संपवली आणि मृत्यूला कवटाळले. पण आजही लाखो तरुण सैन्यात भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी बहुतेक जण वैद्यकीय आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु कोरोनामुळे दोन वर्षांपासून लेखी परीक्षा घेतली गेलेली नाही.

लष्करातील भरती रखडल्याने देशभरात युवकांच्या संताचा उद्रेक होत आहे. बिहारमधील दरभंगामध्ये रविवारी उमेदवारांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी जाळपोळ करून निदर्शने केली. यावेळी संतप्त उमेदवारांनी सर्व शारीरिक चाचण्या उत्तीर्ण झाल्याचे सांगितले. मात्र कोरोनाचे कारण देत लेखी परीक्षा दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात येत आहे. तर त्या तरूणांचे म्हणणे आहे की, कोरोनामध्ये सर्व कामे केली जात आहेत, परंतु लेखी परीक्षा घेतली जात नाही.

हे सुद्धा वाचा

लष्करात अजूनही 80 हजारांहून अधिक पदे रिक्त

यावर्षी 16 मार्च रोजी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात 1 मार्च 2022 पर्यंत लष्करात 12 लाख 12 हजार सैनिक असल्याचे सांगण्यात आले. तर अजूनही 81 हजार सैनिकांची कमतरता असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच गरजेनुसार सैनिकांची संख्या 6.7% कमी आहे. भारतीय सैन्यात भरतीसाठी भरतीचे आयोजन केले जाते. या भरतीत हजारो तरुण सहभागी होतात आणि त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा दिली जाते. 25 मार्च रोजी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लोकसभेत सांगितले होते की, 2020-21 मध्ये 97 भरत्यांचे आयोजन करण्याची योजना होती. त्यापैकी 47 भरत्या घेण्यात आल्या आणि फक्त 4 मध्ये सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती.

कोरोनामुळे लष्करातील भरती रखडली

त्याचप्रमाणे 2021-22 मध्ये 47 भरत्या घेण्यात आल्या आणि फक्त 4 मध्ये सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी एकही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली नाही. सरकारचे म्हणणे आहे की, भरतीमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.

कोरोनामुळे लष्करातील भरती रखडली असताना नौदल आणि हवाई दलात भरती सुरूच आहे. 21 मार्च रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते की, 2020-21 आणि 2021-22 मध्ये कोरोनामुळे सैन्यात भरती झाली नाही. पण या काळात नौदलात 8,319 आणि हवाई दलात 13,032 जणांची भरती झाली.

सैन्यात दरवर्षी किती भरती?

तिन्ही सैन्यात सर्वाधिक भरती लष्करातच होते. गेल्या 7 वर्षांत लष्करात दरवर्षी सरासरी 60 हजार भरती झाल्या. 7 वर्षांत, 2019-20 मध्ये सर्वाधिक भरती झाली. त्या वर्षी 80 हजारांहून अधिक तरूण सैन्यात भरती झाले. त्याचवेळी 2014-15 मध्ये सर्वात कमी भरती झाली. त्या वर्षी 32 हजारांहून कमी तरूण सैन्यात दाखल झाले होते. लडाख आणि पाकिस्तानच्या सीमेवर लष्कराला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत असताना दोन वर्षांपासून लष्करातील भरती रखडली आहे. लडाख सीमेवर चीनसोबत दोन वर्षांपासून तणाव आहे. पाकिस्तानच्या सीमेवरही दोन्ही देशांच्या लष्करामध्ये वारंवार चकमकी होत असतात.

पण सरकार संधी देणार का?

सैनिक म्हणून सैन्यात भरती होण्यासाठी वयोमर्यादा 23 वर्षांपर्यंत आहे. कोरोनामुळे रखडलेल्या नोकरभरतीमुळे अतिवृद्ध झालेल्या तरुणांना सरकार कोणतीही संधी देण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या तीन वर्षांत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी सरकार काही सवलत देणार का, असा प्रश्न 21 मार्च रोजी राज्यसभेत विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लष्कर आणि हवाई दलाने अशा कोणत्याही गोष्टीचा विचार केला नसल्याचे सांगितले होते. मात्र नौदलात नोकरी करणाऱ्या तरुणांना ६ महिन्यांची सूट देण्यात आली आहे.

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.