जातीय जनगणनेला गडकरी यांनी केला कडाडून विरोध, म्हणाले मानवतेच्या आधारावर..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय जनगणनेला विरोध करताना म्हटले आहे की, "मानवतेच्या आधारावर, समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचा विकास केला पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल."

देशात बऱ्याच काळापासून जातीनिहाय जनगणनेची मागणी अनेक राजकीय संघटनाकडून केली जात आहे. लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी देखील खूप मोठ्या काळापासून जातनिहाय जनगणनेची मागणी करत आले आहेत.परंतू केंद्र सरकारकडून यावर कोणतेही पाऊल उचलेले जात नसल्याचे उघड झाले आहे. टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावर ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’ ( WITT ) मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नावर म्हटले आहे की आपण जातीवर बोलण्याऐवजी मानवतेवर बोलूयात, समतेवर बोलू यात. आपण जातनिहाय जनगणनेच्या बाजूने नाही असेच गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
टीव्ही 9 च्या महाव्यासपीठावर देशात जातनिहाय जनगणना गरजेची आहे का ? या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्या जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंग यांनी श्रेष्ठ ठरत नाही तर त्याच्या अंगभूत गुणांनी तो मोठा होतो. ते पुढे म्हणाले की समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, जातीयता जरुर नष्ट व्हायला हवी असेही ते म्हणाले.




येथे पाहा पोस्ट –
#RapidFire: जातिगत जनगणना के खिलाफ क्यों हैं केंद्रीय मंत्री @nitin_gadkari, देखिए TV9 के WITT समिट में क्या दिए तर्क #TV9Network #WhatIndiaThinksToday #IndiainTheNewWorldOrder #TV9WITT2025 #NitinGadkari | @nishantchat pic.twitter.com/4bkAAKGUfh
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 30, 2025
या गोष्टींना वाढवून देशाचा विकास होऊ शकत नाही
मानवतेच्या आधारे समाजातील शेवटच्या पायरीवर जी व्यक्ती उभी आहे. तिचा विकास करायला हवा म्हणजे तो विकासाच्या मुख्यधारेत येईल. आपण जातीवर बोलण्यापेक्षा मानवतेवर बोलूयात, समतेवर बोलूयात, विकासाची गोष्ट करुयात, सामाजिक परिवर्तनाची गोष्ट करावी. तेच देश आणि समाजाच्या रुपाने हितकारक ठरेल. त्यामुळे मला वाटते की या प्रकारच्या गोष्टींना वाढवून देशाचा कुठलाही विकास होऊ शकत नाही.
महागाई आणि रोजगारावर काय म्हणाले गडकरी
देशात महागाई-रोजगार चिंतेचा विषय आहे. टीव्ही 9 च्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की काही समस्या अशा असतात ज्या कधीच संपत नाहीत, कारण एका समस्येवरील उत्तरामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. लोकसंख्या प्रचंड वाढत आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हळूहळू २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्यावर आली आहे. रोजगाराचा हा प्रश्न निश्चितच चिंतेचा विषय आहे.आम्ही लवकरच देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची व्यवस्था करू. आपण रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था निर्माण करू. यामुळे,रोजगाराबाबतची ही चिंता नक्कीच दूर होईल.