शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी इटलीला का गेले? वाचा काँग्रेस काय म्हणतेय?

राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून राहुल गांधी नेहमीप्रमाणे मौजमजेसाठी परदेशात गेल्याची टीका करण्यात आली. | Rahul Gandhi Italy

शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी इटलीला का गेले? वाचा काँग्रेस काय म्हणतेय?
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 12:41 PM

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलन (Farmers protest) ऐन भरात असताना परदेशात गेल्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या टीकेचे धनी होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी राहुल यांची बाजू मांडली आहे. राहुल गांधी यांची आजी आजारी आहे. तिला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचे राजीव सातव यांनी स्पष्ट केले. (To See His Grandmother Congress Defends Rahul Gandhi’s Italy Visit After BJP’s Attack)

संपूर्ण शेतकरी आंदोलनावेळी राहुल गांधी देशातच होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपला विचारून राहुल गांधी यांनी परदेशात जायचे का, असा सवाल राजीव सातव यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत. भाजप फक्त या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयन्त करत आहे, असा आरोप सातव यांनी केला.

राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून राहुल गांधी नेहमीप्रमाणे मौजमजेसाठी परदेशात गेल्याची टीका करण्यात आली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी वैयक्तिक कारणासाठी इटलीला जात आहेत, एवढीच माहिती दिली होती. त्यामुळे शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना राहुल गांधी यांच्या परदेशवारीवर टीका सुरु झाली होती.

राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात का सापडले?

यापूर्वी संसदेत कृषी विधेयक मांडण्यात आले तेव्हादेखील राहुल गांधी आणि सोनिया गांधी परदेशात गेले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणासाठी राहुल गांधी यांना परदेशात जावे लागले असले तरी निर्णायक क्षणी त्यांचे संसदेत उपस्थित नसणे अनेकांच्या डोळ्यात खुपले होते.

त्यानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना परदेशवारी करून राहुल गांधी यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले होते. मात्र, विरोधकांकडून या मुद्दयाचे भांडवल केले जाऊ शकते हे समजल्यानंतर आता काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या परदेशवारीचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी नेत्याकडूनही राहुल गांधींवर टीका

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राहुल यांना लक्ष्य केले होते. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’

(To See His Grandmother Congress Defends Rahul Gandhi’s Italy Visit After BJP’s Attack)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.