Ratan Tata: अब्जाधीश रतन टाटांनी लग्न का केलं नाही? स्वतःच सांगितलं ‘हे’ कारण

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यात उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं. मात्र, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लग्न केलं नाही. असं असंल तरी रतन टाटा यांनी कुणाशीही प्रेम केलं नाही, असंही नाही. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतः आपल्या प्रेमाविषयी सांगितलं. त्यांच्या आयुष्यात प्रेमाने एकदा नाही, तर चारवेळा ठोठावलं होतं. मात्र, आयुष्यातील […]

Ratan Tata: अब्जाधीश रतन टाटांनी लग्न का केलं नाही? स्वतःच सांगितलं 'हे' कारण
ratan tata
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 8:57 PM

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यात उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं. मात्र, त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लग्न केलं नाही. असं असंल तरी रतन टाटा यांनी कुणाशीही प्रेम केलं नाही, असंही नाही. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतः आपल्या प्रेमाविषयी सांगितलं. त्यांच्या आयुष्यात प्रेमाने एकदा नाही, तर चारवेळा ठोठावलं होतं. मात्र, आयुष्यातील कठिण काळात हा प्रेमाचा धागा टिकला नाही. यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच लग्नाविषयी विचार केला नाही. रतन टाटा यांच्या 83 व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयीची ही गोष्ट (Why Ratan Tata didn’t married know all about).

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरतमध्ये झाला होता. त्यांनी टाटा समुहाला नव्या उंचीवर नेताना आपली स्वतःचीही एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यवसायात उत्तुंग यश मिळवणाऱ्या रतन टाटा यांना प्रेमात मात्र अपयशाचा सामना करावा लागला. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविवाहित असलेल्या रतन टाटांनी आपल्या प्रेमाविषयी मनमोकळेपणाने सांगितलं.

रतन टाटा म्हणाले, “मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही. मात्र दूरगामी विचार केला तर लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. कारण मी लग्न केलं असतं तर आताची परिस्थिती काहीशी अधिक गुंतागुंतीची राहिली असती. जर तुम्ही मला विचारलं की मी कधी प्रेम केलं नाही का? तर मी हेच सांगेल की मी 4 वेळा प्रेम करुन लग्नावर गंभीर विचार केला. मात्र, प्रत्येकवेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मी मागे हटलो.”

आपल्या प्रेमाच्या दिवसांविषयी बोलताना रतन टाटा म्हणाले, जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी प्रेमाविषयी सर्वात जास्त गंभीर झालो होतो. केवळ मी तेव्हा भारतात परत आल्याने आम्ही लग्न करु शकलो नाही.” रतन टाटा यांच्या प्रेयसीला भारतात यायचं नव्हतं. त्या काळात भारत आणि चीनचं युद्ध सुरु होतं. अखेर रतन टाटा यांच्या प्रेयसीने अमेरिकेत दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. ज्या व्यक्तीवर त्यांनी प्रेम केलं ती व्यक्ती आताही शहरात आहे का? असं विचारलं असता त्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र, त्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

हेही वाचा :

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी! एवढा मोठा व्यवसाय असतानाही श्रीमंतांच्या यादीत नाहीत रतन टाटा

रतन टाटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव; म्हणाले…

टाटांची जुनी ‘प्रेयसी’, जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित

व्हिडीओ पाहा :

Why Ratan Tata didn’t married know all about

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.