Fact Check | तीन महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होणार?
जर तुम्ही सलग तीन महिने राशन घेतलं नाही तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नवी दिल्ली : जर तुम्ही सलग तीन महिने राशन घेतलं नाही तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दाव्यामुळे अनेक जण संभ्रमात पडले आहेत. परंतु सोशल मिडीयावर फिरणारा मेसेज खोटा असल्याचं फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. PIB फॅक्ट चेकने या दाव्याला चुकीचं ठरवलं आहे. (Why Ration Card Cancelled in 3 months PiB Facts Check)
भारत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने अधिकृत ट्विटर हँडलवरुन सोशल मीडियावरुन फिरणारा मेसेज खोटा असल्याचं सांगितलं आहे. भारत सरकारने अशी कुठलीही घोषणा केलेली नाही, किंवा सरकारचा असा काहीही प्लॅन नाही, असं पीआयबी फॅक्ट चेकने सांगितलं आहे.
कुछ मीडिया रिपोर्ट्स में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार ने राज्य सरकारों को निर्देश जारी किए हैं कि तीन महीने तक राशन नहीं लिए जाने की स्थिति में राशन कार्ड रद्द किया जा सकता है। #PIBFactCheck:- यह दावा फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसे कोई दिशा-निर्देश नहीं दिए हैं। pic.twitter.com/2ujrspote2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 18, 2020
सोशल मिडीयावर फिरणारा मेसेज खोटा
सोशल मिडीयावर फिरणारा मेसेज खोटा आहे. भारत सरकारने अशी कुठलीही घोषणा केलेली नाही किंवा सरकारचा अशी कोणतीही योजना नाही.
कोरोना काळात ज्या प्रकारे खोट्या बातम्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत त्याचप्रकारे भारत सरकारच्या नावाने ही बातमी देखील व्हायरल होत आहे. मात्र या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने सांगितलं आहे. कोरोना काळात पसरणाऱ्या खोट्या बातम्यांना रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. Why (Ration Card Cancelled in 3 months PiB Facts Check)
संबंधित बातम्या
Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?