‘अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते, कित्येकजण तुरुंगात खितपत पडलेत’
कित्येकजण सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. इतरांना अनेक महिने सुनावणीची तारीख मिळत नाही. |
नवी दिल्ली: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे. (Arnab goswami bail plea in supreme court)
दुष्यंत दवे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. याचिकांचा क्रम ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काही नियमच नाही. अर्णव गोस्वामी यांच्या जामिनाच्या याचिकेवर इतक्या तातडीने सुनावणी घेतली जाते. मात्र, कित्येकजण सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. इतरांना अनेक महिने सुनावणीची तारीख मिळत नाही. मग अर्णव यांनाच दरवेळी लगेच कशी तारीख मिळते, असा परखड सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला.
“If we as a constitutional court do not lay down law and protect liberty then who will?… If a state targets an individual like that, a strong message needs to be sent out…Our democracy is extraordinarily resilient,” says Justice Chandrachud of Supreme Court https://t.co/KhIBROOf0p
— ANI (@ANI) November 11, 2020
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. उच्च न्यायालय अनेकदा व्यक्तीस्वातंत्र्याची बाजू घेत नाही. आत्महत्या प्रकरणाचा जरुर तपास व्हावा. त्यामुळे राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असे मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
संबंधित बातम्या:
Ram Kadam | अर्णव गोस्वामीच्या सुटकेसाठी भाजप आमदार राम कदमांचं राष्ट्रपतींना पत्र
Navi Mumbai | अर्णव गोस्वामींच्या अटकेचा नागरिकांकडून जल्लोष, पोलिसांना फूल-मिठाई देत आभार व्यक्त
(Arnab goswami bail plea in supreme court)