दीराचं याड लागलं… एक गोष्ट आडवी आली अन् तिने थेट नवऱ्यासमोरच… विश्वास बसणार नाही असं काय घडलं ?

मुझफ्फरपूरमध्ये एका विवाहित महिला तिच्याच दीराच्या प्रेमात पडली. त्याच्या प्रेमापायी ती तिच्या नवऱ्याला सोडून पळूनही गेली.मात्र त्यानंतर असं काही झालं की आता त्या महिलेने पुन्हा पतीच्याच घराचं दार ठोठावलं आहे, ती आत्याच्या घरासमोरच आंदोलन करत बसली आहे.

दीराचं याड लागलं... एक गोष्ट आडवी आली अन् तिने थेट नवऱ्यासमोरच... विश्वास बसणार नाही असं काय घडलं ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 12:12 PM

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात.. प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो. पण त्यामुळे एखाद्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं तर ? असंच काहीस बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडलं. प्रेमात पडलेल्या एका विवाहीत महिलेच्या निर्णयामुळे अख्ख्या घराची वाताहत झाली. ही विवाहीत महिला तिच्या दीराच्याच प्रेमात पडली, आणि त्या प्रेमापायी ती तिच्या नवऱ्यालाही सोडून निघून गेली. दीर-वहिनी एकत्र फरार झाले, मात्र नंतर त्यांच्या नात्यात असं काही झालं की त्या महिलेला पुन्हा पतीच्या घराचा दरवाजा ठोठवावा लागला. मन भरल्यावर त्या दीराने त्या महिलेशी ब्रेकअप केले आणि तो निघून गेला. यामुळे दुखावलेली महिला पतीच्या घरी परतली. मात्र पत्नी सोडून गेल्यानंतर दुखावलेल्या पतीने तिला पुन्हा नांदवायला नकार दिला. ना पती- ना दीर, आयुष्यात कोणीच नाही,अशी त्या महिलेचा अवस्था झाली आहे. अखेर तिने मुलांना सोबत घेऊन तिच्या पतीच्या घरासमोरच आंदोलन सुरू केलं. एवढं असलं तरी तिला अजूनही तिच्या दीरासोबतच रहायचं आहे.

अहियापुर ठाणे क्षेत्रातील जमालाबाद येथील हे प्रकरण आहे. गेल्या 7 दिवसांपासून देवी ही विवाहीत महिला सरपंचाच्या घरासमोर आंदोलन करत आहे. सरपंचांचा मुलगा मनीष हा तिचा दीर आहे, गेल्या पाच वर्षांपासून त्या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतो. दोघंही लपून-छपून भेटायचे. अखेर महिन्याभरापूर्वी देवी हिने पतीला सोडलं आणि ती प्रियकर, दीरासोबतच दिल्लीला पळून गेली. तेथे एका मंदिरात दोघांनी ग्नही केलं, पण त्यानंतर काही दिवसांतच तो दीरही फरार झाला.

मी आता कुठे जाऊ, महिलेचा सवाल

त्यानंतर किरण देवी या सैरभैर झाल्या आणि गावी परत आल्या. ‘ मी मनीषला अनेकदा फोन केला, पण त्याने प्रतिसाद दिला नाही. मी दिल्लीत कोणाला ओळखतही नव्हतो. अशा परिस्थितीत काही लोकांनी मला मदत केली. त्यांनी माझं ट्रेनचं तिकीट काढलं आणि मला ट्रेनमध्ये बसवलं. कशीबशी मी घरी परतले. पतीच्या घरी परत आले, पण त्याने सोबत नांदवण्यास नकार दिला. शेवटी मी मनीषच्या वडिलांकडे, सरपंचांकडे जाऊन आपबिती सुनावली, न्याय मागितला, पण त्यांनीही मला घरात येऊ देण्यास नकार दिला. आता अशा परिस्थितीत मी माझ्या मुलांना घेऊन कुठे जाऊ?’ असा सवाल त्यांनी विचारला.मला अजूनही मनीष सोबतच रहायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

पाच वर्षापासून होतं नातं

पीडित महिलेने सांगितलं की, ‘ मी मूळचा जमालाबादची आहे. सहा वर्षांपूर्वी माझा विवाह प्रमोद दास यांच्याशी झाला होता. मनीष नात्याने माझा दीर वाटतो. तो मला फोन करायचा, मलाही त्याच्याशी बोलायला आवडायचं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो तेच कळलं नाही. त्याचदरम्यान मी मुलालाही जन्म दिला. पण मनीष आणि माझं प्रेम वाढतच गेलं. तेव्हा मनीषने मला सांगितले की, आपण दोघं दिल्लीला पळून जाऊया. त्याच्या बोलण्याने मीही प्रभावित झालो. महिनाभरापूर्वी आम्ही दिल्लीला पळून आलो. मनीष तेथे मजूर म्हणून काम करायचा. पण महिनाभरातच त्याने माझी अशी फसवणूक का केली हे कळत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझा निष्पाप मुलगा आणि मी एकटे पडलो आहेत, ‘ अशा शब्दात तिने तिची आपबीती सुनावली.

याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार किंवा सूचना मिळालेली नाही.तक्रार आल्यास आम्ही तपास करू कारवाई करू, असे पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.