नवी दिल्लीत काँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढणार?; मल्लीकार्जून खर्गे यांनी दिले हे संकेत

अलका लांबा या एनएसयूआयपासून काँग्रेसशी जुळलेल्या आहेत. काँग्रेसमध्ये योग्य पदं न मिळाल्यानं त्या २०१४ मध्ये काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात गेल्या होत्या.

नवी दिल्लीत काँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढणार?; मल्लीकार्जून खर्गे यांनी दिले हे संकेत
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 6:45 PM

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मतभेद बाजूला सारत INDIA ला एकत्र येऊन आठ महिने झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकमेकांविरोधात बोलू नका, असं आवाहन INDIA तील घटकपक्षांना केलं. परंतु, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये अशा व्यक्तीला घेण्यात आलं जे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नेहमी विरोधात बोलत असतात. यात आघाडीवर नाव आहे ते महिला नेता अलका लांबा यांचे.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या दोन दिवसांपूर्वी २०२४ च्या दिल्ली निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मल्लीकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना दिल्ली काँग्रेसची बैठक पुन्हा बोलवून पक्षाची बाजू मांडावी लागली.

अलका लांबा या केजरीवाल सरकारवर नेहमी हल्लाबोल करतात

अलका लांबा या एनएसयूआयपासून काँग्रेसशी जुळलेल्या आहेत. काँग्रेसमध्ये योग्य पदं न मिळाल्यानं त्या २०१४ मध्ये काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात गेल्या होत्या. २०१५ ते २०२० दिल्ली विधानसभेत चांदणी चौकचे प्रतिनिधीत्व करत होत्या. परंतु, त्यानंतर आम आदमी सोडून त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्या. तेव्हापासून त्या नेहमी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्या आम आदमी पक्षासोबत एकत्र निवडणूक लढण्याच्या विरोधात आहेत. अशावेळी अलका लांबा यांना काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत घेण्यात आले. शिवाय अजय माकन यांनाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये सहभागी करून घेण्यात आले.

तरीही हे नेते कोअर टीममध्ये

काँग्रेसचे नेते अजय माकन यांनीही २०१९ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत एकत्र येण्यास विरोध केला होता. काँग्रेसच्या महिला प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनीही गेल्या काही महिन्यात केजरीवाल यांच्या विरोधात काही पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांनाही मल्लीकार्जुन खरगे यांनी कोअर टीममध्ये घेतले.

केजरीवाल यांचा छत्तीसगडमध्ये बघेल सरकारवर हल्ला

INDIA सोबत आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी छत्तीसगमध्ये रॅली केली. त्यात काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. येत्या काही काळात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाणा विधानसभेत निवडणुका होणार आहेत. २ राज्यात काँग्रेसची सरकार आहे. इतर दोन राज्यात काँग्रेस विरोधात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.