गप्प राहून काँग्रेस खेळणार मोठा गेम? घटक पक्ष कणखर तर कॉंग्रेस मवाळ, नेमका प्लॅन काय?

| Updated on: Feb 05, 2024 | 8:10 PM

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले आहे. त्याला पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, केंद्रीय नेतृत्व त्यावर गप्प आहे. समाजवादी पक्षालाही यूपी काँग्रेस उत्तर देत आहे.

गप्प राहून काँग्रेस खेळणार मोठा गेम? घटक पक्ष कणखर तर कॉंग्रेस मवाळ, नेमका प्लॅन काय?
Follow us on

नवी दिल्ली | 5 फेब्रुवारी 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहे. कॉंगेस आणि स्थानिक पक्ष यांच्यामधील जागा वाटपावरून सुरु झालेली ही धुसफूस आता पक्ष विखरण्यापर्यंत गेली आहे. इंडिया आघाडीतून मोठे पक्ष बाहेर पडत आहेत. इतकी मोठी पडझड होत असतानाही कॉंग्रेस मात्र गप्प आहे. पण हा कॉंग्रेसचा एक मोठा गेम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) चे घटक पक्ष सतत कॉंग्रेसवरच हल्ले करत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानच तृणमूलने काँग्रेसला धक्का दिला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काँग्रेसवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनेक वेळा चर्चा करूनही जागावाटपाबाबत एकमत न झाल्याने समाजवादी पक्षानेही कठोर भूमिका घेतली आहे.

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची अशी कणखर भूमिका असतानाही काँग्रेस नेते गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले आहे. त्याला पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, केंद्रीय नेतृत्व त्यावर गप्प आहे. समाजवादी पक्षालाही यूपी काँग्रेस उत्तर देत आहे.

आगामी निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे घटक पक्ष आक्रमक वृत्ती घेत आहेत. तर कॉंग्रेसने मवाळ भूमिका घेतली आहे. मात्र, हा कॉंग्रेसच्या रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या घटक पक्षांच्या तिखट विधानांना इच्छा असूनही उत्तर देता येत नाही. याचे कारण सांगताना पक्षाचे एका वरिष्ठ नेता म्हणाले, घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काही विधाने केली तर आम्ही भडकणार नाही. त्यावर जर आम्ही काही प्रतिक्रिया दिली तर घटक पक्ष दुरावण्याची भीती आहे. त्याचा परिणाम अन्य घटक पक्षांवर होईल. त्यामुळे आम्ही तशी चूक करणार नाही.

उत्तर प्रदेशमध्येही समाजवादी पक्ष असाच काही प्रयत्न करत आहे. घटक पक्ष जागावाटपाबाबत एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. सर्वच पक्षांना जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. त्यामुळे काही कमी जास्त होणारच. जोपर्यंत तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे इंडिया आघाडीचे भाग आहे तोपर्यंत आमच्या आशा कायम आहेत असेही या नेत्याने सांगितले.

तृणमूल काँग्रेसवर अशी विधाने करण्यासाठी तपास यंत्रणांचा दबाव असू शकतो. अशा स्थितीत काँग्रेसकडून घाईघाईने प्रतिक्रिया देणे चुकीचे ठरेल. जोपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: भारत आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा करत नाहीत. तोपर्यंत आम्ही त्यांना भारत आघाडीचा भाग मानू. त्यामुळे तृणमूल सारखे पक्ष कठोर भूमिका घेत असतानाही कॉंग्रेस मात्र मवाळ भूमिका घेत आहे असेही या नेत्याने स्पष्ट केले.