भारतासाठी या बाबींवर अडचणीचे ठरणार ट्र्म्प ? का संशय घेतला जात आहे

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड निश्चित झालेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतू मैत्री मैत्रिच्या जागी असते परंतू प्रत्यक्षात देश म्हणून संबंध वेगळे असतात.

भारतासाठी या बाबींवर अडचणीचे ठरणार ट्र्म्प ? का संशय घेतला जात आहे
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 6:34 PM

डोनाल्ड ट्र्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्यावर मात केली आणि ते निवडणूक जिंकले आहेत. ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी मोदी आणि भारताबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मैत्री आहे ही बाबही लपून राहीलेली नाही. परंतू अशा अनेक बाबी आहेत ज्यावर गेल्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी भारताला अडचणी आणल्या होत्या. त्यामुळे यावेळी ट्रम्प यांचे धोरण भारताला फायदेशीर ठरेल का? असे कोणते विषय आहेत ज्यावर भारताला अडचण येऊ शकते.

व्यापारावर होऊ शकतो परिणाम –

असे म्हटले जात आहे की ट्रम्प यांच्या पुन्हा निवडून येण्याने भारताच्या व्यापारी संबंधांवर प्रभाव पडू शकतो. असे म्हटले जात आहे की डोनाल्ड यांचे आर्थिक धोरण अमेरिका फर्स्ट असे राहीलेले आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना अडचणी येऊ शकतात. डोनाल्ड यांनी आधीच्या टर्ममध्ये अमेरिकन उद्योगांना संरक्षण देण्याची धोरण निश्चित केले होते. त्यांनी भारत, चीन सह अनेक देशांतील आयातीवर मोठे शुल्क आकारण्याचे धोरण राबवले होते.तसेच भारताला देखील काही अमेरिकन उत्पादनावरील आयात शुल्क कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे ट्रम्प यांचे हे धोरण पुढे चालले तर व्यापारात भारताला नुकसान होऊ शकते.

व्हीसा पॉलीसीवर देखील नजर

भारताचे लक्ष ट्रम्प यांच्या व्हीसा पॉलीसीवर देखील असणार आहे. त्यांच्या धोरणांना भारतीय लोकांना शिक्षण तसेच अन्य कारणांनी अमेरिकेत जाताना अडचणी वाढतात. ट्रम्प या मुद्याला निवडणूक प्रचारात टाळत होते. अनेक भारतीय अमेरिकेत टेक्नॉलॉजी कंपन्यात काम करत आहेत. तेथे ते ‘H-1 B’ व्हीसावर जातात, ट्रम्प यांनी आपल्या काळात ‘एच-1बी’ व्हीसाचे नियम कठोर केले होते.ट्रम्प यांच्या धोरणाने भारतीय इंजिनियर, तंत्रज्ञ तसेच टेक्नोलॉजी कंपन्यांवर खूप मोठी परिणाम पाहायला मिळाला होता. जर ट्रम्प जुन्या धोरणावर अडून राहीले तर भारतीयांना अमेरिकेतील नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले.

हे सुद्धा वाचा

कश्मीरवर अमेरिकेचा डोळा

आपल्या आधीच्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीर प्रकरणात मध्यस्थीच्या पर्यायावर चर्चा केली होती. कश्मीर प्रश्न मध्यस्थांमार्फत सुटावा अशी मोदींची देखील इच्छा आहे असे ट्रम्प यांनी बोलून अडचणीत आणले होते.परंतू भारताने लागलीच अमेरिकेचा हा दावा फेटाळला होता.आणि मोदी यांनी ट्रम्प यांना असे काहीही सांगितले नसल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानने ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले होते. परंतू भारताला अवघडल्या सारखे झाले होते. कश्मीर प्रश्नात कोणत्याही देशाची मध्यस्थता भारत स्वीकार करणार नाही असे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे. आता नव्या कार्यकाळात ट्रम्प यांचे धोरण भारताला पोषक असणार का हा येणार काळच सांगणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.