Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 update : चंद्रयान-3 नंतर इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकेल का ? भारताचं गगनयान केव्हा जाणार चंद्रावर ?

चंद्रावर मानव पाठविण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांत कोणीच केलेला नाही. चंद्रावर मानवाला पाठविण्याचे इस्रोचेही लक्ष्य आहे. गगनयान मोहीमेची त्यासाठी तयारी सुरु आहे.

Chandrayaan-3 update : चंद्रयान-3 नंतर इस्रो चंद्रावर मानव पाठवू शकेल का ? भारताचं गगनयान केव्हा जाणार चंद्रावर ?
moon missionImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 10:06 PM

नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : भारताचे चंद्रयान-3 सर्वकाही सुरळीत परिस्थिती असेल तर येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड होणार आहे. असं करणारा भारत जगातला पहीला देश ठरणार आहे. कारण दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करण्याचे धाडस आतापर्यंत कोणी केलेले नाही. या क्षणाची अब्जावधी भारतीय वाट पहात आहेत. रशियाच्या लूना-25 या यानाने हा प्रयत्न केला होता, पण ते शनिवारी चंद्राच्या कक्षेतच क्रॅश झाले आहे. परंतू चंद्रयान-3 नंतर चंद्रयान-4 मध्ये इस्रो चंद्रावर मानव पाठविण्याची तयारी करु शकतो का ? याविषयी उत्सुकता वाढली आहे.

चंद्रावर मानव पाठविण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांत कोणीच केलेला नाही. चंद्रावर किंवा मंगळावर मानवनिर्मित उपग्रह पाठविण्यातच अनेक अडचणी असतात. तेथील गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणे अवघड आहे. हे इतके अवघड आहे की अमेरिका आणि रशियाच्या सलग 14 चंद्र मोहीमांना अपयश आले, नंतर 15 व्या मोहीमेत यश मिळाले. या मानाने चंद्रयान-1 मोहीम त्यामानाने यशस्वी ठरली आहे. इस्रोनेच्या पहील्याच चंद्रयान-1 मोहीमेने चंद्राचा अभ्यास करीत तेथे बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याचे शोधले होते.

आतापर्यंतच्या मानवी मोहीमा 

अमेरिकेच्या नासाने अपोलो-11 मोहिमेत चंद्रावर 21 जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, मायकल कॉलिन्स आणि बज आल्ड्रीन या तीन अंतराळवीरांना पाठविण्यात यश मिळविले होते. त्यातील नील यांनी चंद्रावर पहीले पाऊल ठेवले तर पाठोपाठ मायकल उतरले, तर बज चंद्राच्या कक्षेत यान उडवित राहीले. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1969 अपोलो-12 मोहीमेत तीन अंतराळवीरांना धाडले. त्यानंतर 7 डिसेंबर 1972 रोजी अपोलो- 17 मोहीमेत अखेरचे तीन मानव चंद्रावर गेले. तीन वर्षांत अमेरिकेचे 12 अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. यात अनेकदा अपयश आले. 21 फेब्रुवारी 1967 मध्ये अपोलो-1 प्रक्षेपणावेळी स्फोट होऊन दोन अंतराळवीरासह 27 जणांचा मृत्यू झाला.

चंद्रयान मोहीमेचा इतिहास

इस्रोला केवळ चंद्रावर रोव्हर आणि लॅंडर पाठविण्याचा उद्देश्य नसून चंद्रावर मानव पाठविण्यासाठी भारताची गगनयान मोहीम राबविली जाणार आहे. परंतू चंद्रावर मानव पाठविणे एवढे सोपे नाही. म्हणून हळूहळू चंद्र मोहीमेत अनेक टप्पे पूर्ण करीत आहे. चंद्रयान-1 मध्ये ऑर्बिटर आणि मून इम्पॅक्ट प्रोब लॉंच केला, चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसोबत लॅंडर आणि रोव्हर पाठविला. तर चंद्रयान-3 मध्ये केवळ लॅंडर आणि रोव्हर पाठविला आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर चंद्रयान-4 च्या मोहीम होईल. त्यात यश आल्यानंतर मानव पाठविण्याबाबत विचार होईल, त्यासाठी अधिक शक्तीशाली रॉकेटची गरज लागेल.

राकेश शर्मा यांचा इतिहास

भारताचे राकेश शर्मा रशियाच्या सोयूज टी-11 मधून 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात आठ दिवस राहण्याचा विक्रम केला आहे. गगनयान मोहीमेत तीन अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर पोहचून तीन दिवसांचा थांबा देऊन त्यांना सुखरुप परत आणण्याची योजना आहे.

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.