Video: पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्याबाबत काय बोलाल तर…! नारायण राणे यांनी उद्धव गटाला दिला असा इशारा

लोकसभेत अविश्वास प्रस्तावादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना खडे बोल सुनावले. तसंच पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्याबाबत भलतंसलतं बोललं तर...

Video: पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्याबाबत काय बोलाल तर...! नारायण राणे यांनी उद्धव गटाला दिला असा इशारा
Video: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याबाबत भलतंसलतं ऐकून घेणार नाही! नारायण राणे स्पष्टच म्हणाले की...
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 7:14 PM

नवी दिल्ली : लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्रातील खासदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर बोचरी टीका केली. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी संसदेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीवर टीका केली. या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी शिवसेनेच्या इतिहास वाचून दाखवला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना इशारा दिला.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे ?

“अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना मला असं वाटत होतं की मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो आहे. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सांगत आहे. पण हा शिवसेनेत कधी आला. मी 1966 चा शिवसैनिक आहे. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा 220 लोकांनी विरोध केला होता. आता काही लोकंच वाचले आहे. हे वाघ नाहीत तर मांजर आहेत. ते संपले आहेत. त्यांची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही. तुम्ही जर आमचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोट जरी दाखवलं ना तर तुमची लायकी का आहे दाखवून देईन. “, असं जोरदार प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण यांनी विरोधात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना दिलं.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला हनुमान चालिसेचा मुद्दा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीवर टीका केली. राज्यात हनुमान चालिसा म्हणण्यावर देखील बंदी होती असं त्यांनी सांगितलं. तसेच ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाही तुरुंगात टाकलं. पत्रकारांनाही तुरुंगात टाकण्याचं काम यांनी केल्याचं त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....